अपघात रोखण्यासाठी धुळे रोडवरील रेल्वे पुलावर तात्काळ उपाययोजना करावी संभाजी सेनेचे निवेदन


अपघात रोखण्यासाठी धुळे रोडवरील रेल्वे पुलावर तात्काळ उपाययोजना करावी संभाजी सेनेचे निवेदन

( चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
चाळीसगाव शहरातील धुळे व मालेगाव कडे जाणारा रेल्वे पूल मृत्यूचा सापळा बनला असून या रेल्वे पुलावर रोज छोटे-मोठे अपघात होत असतात, शिवाय महिन्यातून किमान दोन-तीन मोठे अपघात होऊन काही लोकांचा जीव देखील जात असतो, असे असतांना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे, प्रशासन अजून किती लोकांचा जीव जाण्याची वाट पाहणार आहे असा संतप्त सवाल नागरिकांना पडत आहे. त्यामुळे या रेल्वे पुलावर तात्काळ वेगाला आवर घालण्याच्या उद्देशाने स्पीड ब्रेकर किंवा रंबलर माहिती झेब्रा क्रॉसिंगचे व्हाईट पट्टे तसेच रिफ्लेक्टर अशी काही ना काही उपाययोजना करून लोकांचा जीव वाचवा अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असून याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापु शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अभियंता आणि शहर वाहतूक शाखा यांना देण्यात आले आहे. निवेदनावर आबासाहेब सौंदाणे, अविनाश काकडे, सचिन जाधव, दिवाकर महाले, अमित काळे, संजय रावते, प्रशांत अहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें