डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चाळीसगाव येथे दि 13 व 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दि 13 व 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, राजवाडा, चाळीसगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा, मंगळवार दि.14 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत भीम संदेश अभिवादन मोटार सायकल रॅली निघणार आहे, तसेच सायंकाळी 5 वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा स्टॉप येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होवून तेथून मिरवणूक निघणार असून मिरवणूक समारोप 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा येथे होवून याठिकाणी मुंबई येथील सुप्रसिद्ध सुपरस्टार गायक प्रयुध्द जाधव, अभिनेत्री गायिका मोनल कहलक, गायक निलेश सोनवणे, सदाबहार नृत्यकार लतिका तेंबुलकर, हर्षदा सुरेश मोहिते, गायक बुद्धभूषण उबाळे, खान्देशी सुपरस्टार भैय्या मोरे यांचा भीम गीतांचा भव्य प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता स्व. सीमाताई मांगीलाल आग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेमी, माता, बंधु -भगिनीं यांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने जयंती उत्सवात उपस्थित राहावे असे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.









