१०२ रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत; रुग्णांचा  जीव टांगणीला

१०२ रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत; रुग्णांचा  जीव टांगणीला

जळगाव जिल्हा 

प्रतिनिधी :बाळू वाघ 

 

​वाकडी जामनेर तालुका येथील रुग्णांना जीवनदान देणारी १०२ रुग्णवाहिका आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. येथील एका १०२ रुग्णवाहिकेचा चालक चक्क दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे समोर आले असून, यामुळे आरोग्य प्रशासनाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेआहे.

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार,  10 /04/2026रोजी रात्री जामनेर येथील उप जिल्हा रुग्णालयात 11.45 वाजता हा  रुग्णाला घेऊन जात असताना रुग्णवाहिकेच्या वेगावर आणि वळणांवरून नागरिकांना संशय आला. रुग्णवाहिका थांबवली असता, चालकाला बोलता ही येत नव्हते. तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

​रुग्णांच्या जिवाशी खेळ

​’गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचवणे अपेक्षित असताना, चालकाच्या या कृत्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता.

​प्रशासनाकडून कारवाईची मागणी

​या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ज्यांच्या हाती लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी आहे, तेच जर असे वागत असतील तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

​संबंधित चालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

​आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन चालकाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

​वेळेवर उपचार मिळणे हा रुग्णाचा हक्क आहे, पण अशा बेजबाबदार चालकांमुळे हा हक्क धोक्यात येत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें