डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 12 एप्रिल रोजी चाळीसगावी भीमगीत संध्या कार्यक्रम आयोजित
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सालाबादप्रमाणे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौजन्याने गेल्या 4 वर्षांपासून सुरु असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य तालुकास्तरीय भीमजयंती उत्सव समिती आयोजित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायकांच्या प्रमुख उपस्थितीत भीमगीत संध्या कार्यक्रम दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कुंकू लावील रमानं फेम, बाप माझा भिमराव फेम, सुप्रसिद्ध गायिका सुष्मा देवी, मला आमदार झाल्या सारखं वाटतंय, माझ्या भीमाच नाव हायर इंटरनेशनल एपटीला फेम, सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे, माझी बाय गो – नखरेवाली फेम
आपली यारी फेम – सुप्रसिद्ध गायिका सोनाली सोनवणे, अटक करा पुण्यात फेम – सुप्रसिद्ध गायक – अजय गायकवाड, झी मराठी फेम सिद्धार्थ लीला ऑर्केस्ट्रा सुप्रसिद्ध गायक – निलेश सोनवणे, (इंडियन आयडॉल मराठी फायनलीस्ट) आनंद शिंदे यांचे लाडके शिष्य सुप्रसिद्ध गायक – प्रतीक सोळसे तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक – गोविंद गायकवाड यांच्या सदाबहार परंपरेची भीमगीत संध्या हा गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समिती, चाळीसगाव सर्व सदस्य व कार्यकारिणी यांनी केले आहे.









