उपळवे पंचक्रोशीत राजे गटाला मोठे खिंडार; सोसायटी चेअरमन प्रदीप लांभाते यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश! रणजीत सिंहाच्या उपस्थितीत झाला सोहळा

उपळवे पंचक्रोशीत राजे गटाला मोठे खिंडार; सोसायटी चेअरमन प्रदीप लांभाते यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश! रणजीत सिंहाच्या उपस्थितीत झाला सोहळा

फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील उपळवे पंचक्रोशीत राजे गटाला मोठा धक्का. पाच गावांच्या सोसायटीचे चेअरमन प्रदीप लांभाते यांच्यासह आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सोहळा.

फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीत राजे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उपळवे पंचक्रोशीतून राजे गटाला मोठे खिंडार पडले असून उपळवे जाधव नगर सावंतवाडी दरेवाडी आणि वेळोशी या पाचही गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रदीप विष्णुपंत लांभाते यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. 

 माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. रणजितसिंह यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 पंचक्रोशीतील दिग्गज भाजपच्या गळाला

 उपळवे पंचक्रोशीत वर्चस्व असलेल्या अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि चेअरमन यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने या भागात भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे. सोसायटीचे चेअरमन प्रदीप लांभाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशामुळे राजे गटाची या भागातील पकड ढिली झाल्याचे मानले जात आहे. 

भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते:

यावेळी खालील प्रमुख मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केला

🟡 श्री प्रदीप विष्णुपंत लांभाते ( चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी)

🟡 श्री. सोमनाथ छगन लांभाते( सदस्य ग्रामपंचायत उपळवे)

🟡 श्री निलेश अंकुश लांभाते(माजी चेअरमन, वि. का. सोसायटी)

🟡 श्री निलेश शंकरराव लांभाते

🟡 श्री दादासो लक्ष्मण गोफने

🟡 श्री रमेश श्रीरंग लांभाते

🟡 श्री शरद जयसिंग लांभाते

🟡 श्री जयवंत भिकाजी जाधव

🟡 श्री भानुदास दौलती लांभाते

🟡 श्री सागर दत्तात्रय नाचन

🟡 श्री अंकुश मुगुटराव लांभाते

🟡 श्री अशोक मानसिंग लांभाते

🟡 श्री दिगंबर जगन्नाथ लांभाते

🟡 श्री अजित भानुदास लांभाते

🟡 श्री सुनील बजरंग लांभाते

🟡 श्री राहुल रामचंद्र लांभाते

🟡 श्री संग्राम विलास लांभाते

🟡 श्री रवींद्र निवृत्ती लांभाते

🟡 श्री तानाजी उत्तम पवार

🟡 श्री दीपक एकनाथ जाधव जगताप

🟡 श्री दत्तात्रय बबन जगताप

🟡 श्री राहुल सुरेश लोंढे

 या प्रवेश सोहळ्याप्रसंगी उपळवे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री विक्रम लंबाते आणि उपसरपंच श्री शेखर लंबाते यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे या प्रवेशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. असून संपूर्ण उपळवे गाव आणि पंचक्रोशी आता रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal