दुचाकी वाहनांसाठी एम एच ५३ डी नवीन मालिका सुरु

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हयात दुचाकी वाहनांसाठी दिनांक 6 ऑक्टोंबर पासुन एम एच ५३ डी 0001 ते 9999 ही नवी मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक घ्यायचे आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आकर्षक क्रमांक फी भरुन आरक्षित करुन ठेवावेत. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फलटण संदिप म्हेत्रे यांनी कळविले आहे.

पंसतीचा नोंदणी क्रमांक देण्याकरीता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येईल. अर्जासोबत विहित पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत सादर करणे आवश्यक राहील. अर्जदाराने त्याचे स्वत:चे ओळखपत्र उदा. आधारकार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यांची सांक्षाकित प्रत तसेच वाहनचालकाचा वैध ई-मेल आयडी, वैध मोबाईल नंबर, पिन कोड नंबर देणे बंधनकारक राहिल. 6 ऑक्टोबरपर्यंत जे वाहनधारक वाहनासाठी तिप्पट फी भरुन दुचाकी वाहन मालिकेतील वाहन क्रमांक घेण्यास इच्छुक आहेत त्यांचे चारचाकी वाहनांचे एल एम व्हि अर्ज सकाळी 10 ते 2 दोन वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील. ज्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्यास त्याच दिवशी आकर्षक क्रमांक देण्यात येईल. मात्र एकापेक्षा जास्त अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणीक्रमांकासाठी अर्ज केला असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा. जो अर्जदार जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आकर्षक क्रमांकासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह अर्ज स्विकारले जातील. मात्र एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास अर्जदारांनी कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा. सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्यास आकर्षक क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येईल. आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर १८० दिवसाच्या आत वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फलटण संदिप म्हेत्रे यांनी कळविले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal