फलटणमध्ये बनावट खत रॅकेट! भ्रष्ट अधिकाऱ्यांचा काळा कारनामा! शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची लूट!
फलटण (प्रतिनिधी)
जिल्ह्यात उघड झालेल्या बनावट खतांच्या रॅकेटने कृषी विभागाच्या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचा काळा चेहराच समोर आणला आहे. फोन संभाषणांनी भ्रष्टाचाराचे पुरावे पक्के झाले, पण कारवाई मात्र गायब! लाखो रुपयांचा खेळ होऊन *शेतकऱ्यांची सरळ लूट* केली जात असताना अधिकारी मात्र कागद फाडून रॅकेट झाकत बसले आहेत. शेतकरी ओरडतो “आमच्या घामाची किंमत अशी काय? आमचे पिकं नष्ट करूनही अधिकारी पैशाच्या दलालीत विकले जातील?”
बनावट खतांची जप्ती – पण केस कुठे?
फलटण तालुक्यात महिनाभरापूर्वी बनावट खतांचा साठा जप्त झाला. तो खटला *गुन्ह्यात* का बदलला नाही? पत्रकारांनी कृषी अधिकारी गायकवाड यांना विचारले असता त्यांनी सरळ खोटं बोलल आमच्या अधिकार कक्षेत नाही गुणवत्ता निरीक्षक यांनी तर हातच झटकले.
“कसली कारवाई? काही झालेलंच नाही!”*
अधिकारी टाळाटाळ करत म्हणाले “मी कारवाई केलीच नाही, केस करायची असेल तर करा!” म्हणजे जप्त झालेला डुप्लिकेट माल, बनावट खतांची पिशवी, स्टॉक—सगळं मिटवण्यात आलं होतं!
पंधरा लाखांचा झोल त्यामुळे अधिकारी गप्पच
एक सूत्र पुढे आलं आणि धक्कादायक खुलासा केला: *“रेड झाली खरी, पण 15 लाखांचा झोल करून कागद गायब केले! फडतरे आणि सुतार दोघेही खेळात होते?. मालाचा सिरीयल नंबर गायब, अहवाल फाडून टाकला आणि दुकानदारांकडून पैसे उचलले!”*
म्हणजे रेड खोटी, कारवाई खोटी आणि सगळा खेळ “दाखवायला” झाला होता. खरं तर हा घोटाळा *शेतकऱ्यांच्या घामावरच तुडवून* करण्यात आला.
फडतरे यांचा निर्लज्ज पळवाट उत्तर
पत्रकारांनी गुण नियंत्रक फडतरे यांना विचारले असता त्यांचे उत्तर “कसली रेड? काही संबंध नाही!”पण सूत्रांचे संभाषण सांगते की पावत्याशिवाय सर्व कागद फाडले गेले, खरे पुरावे नष्ट केले गेले. म्हणजे गुणनियंत्रक यांच्या सहभागाचा ठोस पुरावा आहे, आणि तरीही ते सरळ हात झटकतात.
शेतकऱ्यांचा विश्वासघात, पिकांचा नाश
या बनावट खतांमुळे डाळिंबासह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पिके लावली आणि त्यात खताऐवजी भेसळ टाकण्यात आली. शेतकऱ्यांचा संताप प्रचंड आहे. एक सूत्र थेट म्हणाले “अधिकारीच भ्रष्ट झालेत. कागद फाडतात, पैसे खातात, आणि आम्हाला मातीत घालतात!”*
शेतकऱ्यांचे पिकं मरतात, जमीन कोरडी पडते आणि अधिकारी मात्र अधिकारी खुर्चीत बसून दलालीत नफा कमावतात.
पंधरा लाखांचा काळा खेळ कोणाच्या आश्रयाने? जिल्हा कृषी अधीक्षक आणि सातारा जिल्हाधिकारी यांनी याबाबत खुलासा करावा!
कागद फाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा का दाखल होत नाही?
दुकानदारांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी कोण करणार?
लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरणार?
हा सरळ **शेतकऱ्यांचा विश्वासघात** आहे. ही थेट *आर्थिक, सामाजिक आणि कृषी हत्या* आहे.
एवढेच नव्हे तर हा बनावट महाधन 9:24:24 चा साठा गायब फलटणच्या पश्चिमेकडील एका मोठ्या दुकानदाराकडे तर फलटण शहरातील स्टेट बँके समोरील तर एका मोती चौकातील मोठ्या व्यापाऱ्याकडे मोठा साठा सापडला असल्याची चर्चा आहे.
या धन दांडग्या मोठ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन काळ्या मातीची दलाली केली. अशा दलालखोर अधिकाऱ्यांवर
कठोर कारवाईची मागणी
पत्रकार, शेतकरी आणि जनतेला उघड झालेल्या या भ्रष्टाचारामुळे संतापाचे वारे उठले आहेत. प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल न केल्यास साताऱ्यासह् फलटणच्या शेतकऱ्यांचा रोष भीषण स्वरूप धारण करेल.
संपूर्ण रॅकेट उघडे पडले आहे. आता शेतकऱ्यांचा एकच सवाल“आमच्या घामावर उठवलेले लाखांच्या भ्रष्टाचाराचे साम्राज्य कधी उद्ध्वस्त होणार?”













