सह्याद्री प्रतिष्ठानचा शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान 

सह्याद्री प्रतिष्ठानचा शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान 

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):- 

 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना महाराष्ट्रभरातील गड किल्ल्यांच्या संवर्धनामध्ये अग्रेसर असून आजपर्यंत अनेक किल्ल्यांच्या साफसफाईच्या कामांबरोबरच जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या तोफा सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना सन्मानपूर्वक सागवानी तोफ गाडे बनवून त्यावर बसविण्यात आले आहे, तर तर 40 पेक्षा अधिक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांना सागवानी दरवाजे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांना धरून बसविले आहेत, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही छोटीशी संघटना आज वटवृक्षाच्या स्वरूपात संपूर्ण देशभर पसरली असून पुरातन वास्तू, गड किल्ले, पुरातन बारव पाहण्याचे टाके, यांचे संवर्धन कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच आता ज्या ज्या ठिकाणी परकीय आक्रमकांनी हिंदूंचे देवस्थान मंदिरे तोडले आहेत त्या त्या किल्ल्यावरील मंदिर पुन्हा उभारण्याचे कार्य सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे, सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावचे सर्व दुर्गसेवक प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दुर्ग संवर्धन कार्य करीत असून जळगाव धुळे नाशिक व संभाजीनगर जिल्ह्यामधील अनेक किल्ल्यांवर मोहिमा घेऊन संवर्धन कार्य मोठ्या प्रमाणात केल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या चाळीसगाव येथे आयोजित मेळाव्यात या संपूर्ण सदस्यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयवंत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आले, यावेळी तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील तालुका पदाधिकारी चंद्रकांत ठाकरे व सर्व सदस्य उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार