‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा पुण्यात हृदय सत्कार

‘दुबईमित्र’ सोमनाथ पाटील यांचा पुण्यात हृदय सत्कार

पिंपरी, पुणे प्रतिनिधी: गेल्या काही वर्षात मराठी जणांचे विशेषत: पुणेकरांचे दुबईतील चैतन्यशील मित्र साहित्य, संस्कृती ,नाट्य ,संगीत, चित्रपट कलावंत आणि राजकीय व्यक्तींचे स्नेही ,दुबई सह बेळगाव आणि परिसरातील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सोमनाथ पाटील यांचा हृदय सत्कार रविवारी (दि . ८) पुण्यात करण्यात आला. यावेळी दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीमधील त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

दुबई सरकारमध्ये 37 वर्ष उच्च पदावर असलेल्या सोमनाथ पाटील यांच्या पुण्यातील मित्र परिवाराच्या वतीने हा अनौपचारिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते प्रवीण तरडे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. सहकार बँकिंगतज्ञ आणि राज्य सरकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, संवाद संस्थेचे सुनील महाजन ,पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई ,ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे, उद्योजक समीर  लडकत, युवराज शहा, संतोष मोरे ,’एमइडीसी’ चे उपाध्यक्ष सचिन इटकर, खानापूर बेळगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष पीटर डिसूजा, निवृत्त ब्रिगेडियर किशोर जाधव, पिंपरीतील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर शहाजी चव्हाण, डॉक्टर सतीश जगताप, मिलिंद कुलकर्णी, कैलास केंजळे , रणजीत देशमुख आदी उपस्थित होते .डॉ.पी डी पाटील (कुलपती डी, वाय ,पाटील विद्यापीठ) ,अशोक विखे पाटील (अध्यक्ष विखे पाटील फाउंडेशन ) ,शिवाजीराव कदम (कुलपती, भारती विद्यापीठ )यांनी सोमनाथ पाटील यांना आभासी माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सोमनाथ पाटील यांच्या पत्नी शालन पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. 

एकेकाळी  पर्शियाच्या आखातामधील हे छोटं खेडेगाव असलेलं दुबई आज श्रीमंती मिरवणार जगप्रसिद्ध शहर बनलं आहे. हे शहर वसवण्यात असंख्य भारतीयांचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या मेहनतीतून ,सर्जनातून दुबईचा कायापालट झाला. सोमनाथ पाटील त्यापैकी एक. बेळगावजवळच्या छोट्या गावातून ऐंशीच्या दशकात शारजाह आणि नंतर दुबईत बांधकाम अभियंता म्हणून गेलेले सोमनाथ पाटील तिथल्या सरकारमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर विभागाचे व्यवस्थापक आणि प्रकल्प सल्लागार बनले. दुबई सरकारचे अनेक उपक्रम सोमनाथ पाटील यांनी यशस्वी केले. त्यांना संयुक्त अरब अमिराती सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

मराठीजनांच्या प्रेमाचे धनी –

दुबई शहर प्रसिद्धीला आले तसे भारतीयांची आणि मराठीजनांची पावले या शहराकडे वळली. गेल्या काही वर्षांच्या काळात सोमनाथ पाटील मराठीजनांचे दुबईतील जणू आधारस्तंभ बनले. खानापूर जवळील एका गावातील प्राथमिक शिक्षक स्व. जायाप्पा पाटील व अनसुया पाटील यांचे ते पुत्र. आपल्या सुमारे चार दशकांचा दुबईतील जीवनप्रवास कथन करताना सोमनाथ पाटील यांनी बेळगावहून मुंबईत आल्यानंतर व तिथून दुबईत गेल्यानंतरचे अनुभव कथन केले. या शहराविषयी आणि तिथं त्यांना स्थिरस्थावर करण्यास मदत करणाऱ्या राज्यकर्त्यांबद्दल बोलताना त्यांना अनेकदा गहिवरून येत होतं. सत्काराला उत्तर देताना त्यांनी मराठीजनांना दुबईत हरप्रकारे मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सोमनाथ पाटील यांनी एक हृद्य आठवण त्यांनी सांगितली. लहानपणी क्रिकेटचे सामने बघण्यासाठी दुसऱ्याच्या घरी जात. शारजाह इथे नोकरीनिमित्त गेल्यावर शारजाह क्रिकेट मैदान उभं करण्यात त्यांनी वाटा उचलला. या मैदानावर पाटील यांना शारजाह क्रिकेट सिरीज मॅनेजमेंट टीमचे सदस्य म्हणून काम करता आले. चंदू बोर्डे, कपील देव, वेंगसरकर आदी भारतीय क्रिकेटपटूंसह विवियन रिचर्ड्स आदी अनेक क्रिकेटपटूंशी त्यांचा स्नेह जुळला.

 

जितेंद्र भुरुक यांनी पाटील यांच्यासाठी विशेष गीत गायले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन संस्थेचे जमीर मुल्ला आणि आयकॉनिक अल्फासचे प्रिया माने यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें