चाळीसगाव एमआयडीसी येणार उद्योग व्यवसायाच्या केंद्रस्थानी, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक निर्णय

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-

चाळीसगाव तालुका सध्या डी प्लस झोनमध्ये समाविष्ट नसल्याने जागा उपलब्ध असूनही गेल्या ५ वर्षात एकही मोठा उद्योग तेथे येऊ शकला नाही, त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध औद्योगिक सवलती, अनुदाने व प्रोत्साहन योजना लागू होत नाही. त्यामुळे स्थानिक उद्योजक व युवकांना उद्योग उभारणीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सद्यस्थितीत चाळीसगाव एमआयडीसी मध्ये भारत वायररोप, गुजरात अंबुजा व बिरला प्रीझिशन आदी प्रमुख कंपन्या यशस्वीपणे सुरु आहेत, चाळीसगावची भौगोलिक परिस्थिती पाहता रेल्वे व महामार्गाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे कनेक्टीव्हिटी हि नवीन उद्योगांसाठी अनुकूल आहे. उद्योग विभागाचे झोन निर्धारण निकष – सामाजिक मागासलेपण, बेरोजगारीचा दर, प्रति व्यक्ती उत्पन्न, स्थलांतर दर, औद्योगिक वाणिज्य स्थिती- हे सर्व निकष बघता जळगाव औद्योगिक क्षेत्रात विशेषतः चाळीसगाव औद्योगिक क्षेत्राचे D+ Zone मध्ये समाविष्ट करणे क्रमप्राप्त ठरते अशीमागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले. या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत चाळीसगाव तालुक्याचा D+ झोन मध्ये समावेश करण्याचा तत्काळ निर्णय करण्यात आला आहे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार, सबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील प्रमुख एमआयडीसी पैकी एक असणाऱ्या चाळीसगाव तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. दरम्यान या निर्णयाबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांचे आभार मानले. 

चाळीसगाव MIDC चा ‘D+’ झोनमध्ये समावेश झाल्याने खालीलप्रमाणे लाभ मिळेल,

० उद्योगांसाठी ६०%-८०% प्रोत्साहन अनुदान, वीज सवलती, कर सवलती.

० त्यानुषंगाने मोठ्या प्रमाणात औद्योगिक व इतर गुंतवणुक होण्यास मदत होईल.

० स्थानिक युवकांना उद्योग व रोजगाराच्या संधी.

० स्थलांतराचा दर कमी होईल.

० कृषी मालावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.

० जिल्ह्यातील औद्योगिक व वाणिज्यिक परिसंस्थेला मोठी चालना मिळेल.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal