नालंदा विद्यालयात पार पडले तीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
शहरातील नालंदा विद्यालयात तब्बल तीस वर्षांनी इयत्ता दहावीच्या 1994/95 मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर नुकतेच पार पडले, यात जवळपास 34 मित्र-मैत्रिणी उपस्थित होते, यावेळी अध्यक्ष म्हणून नालंदा विद्यालयातील सध्याचे मुख्याध्यापक रावते सर तर प्रमुख आतिथी प्रमुख म्हणून 1994/ 95 या वर्षात शिकविणारे व आता निवृत्त झालेले शिक्षक होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील माजी विद्यार्थी कविता कोकाटे व आताचे विद्यार्धी आशिष अहिरे यांनी केले, कार्यक्रमाची संगीत रचना करण्याची जबाबदारी रवी खंडु, निकम सर यांनी केले, या स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याची ओळख परिचय तसेच अनेक मनोरंजक खेळ, संगीत खुर्ची, डान्स, गाणे, गाण्यातील वस्तु ओळखणे असे नविन्यपुर्ण खेळ खेळले गेले, कार्यक्रमाची प्रस्तावना आशिष अहिरे यांनी केली, त्यांनी आजच्या काळात गेट टुगेदर का आवश्यक आहे या संदर्भात आपल्या प्रस्तावीकेत सांगीतले, माजी विद्यार्थ्यानमधुन शितल देशमुख व रवी निकम यांनी मनोगत व्यक्त केले, सेवानिवृत्त शिक्षकानमधुन पी. पी. पगारे, माजी मूख्यध्यापक सोंमवंशी आबा, डी.एल चव्हाण यांनी विद्यार्थ्याना आजचे वेगवान जीवन शैली व व्यायामाचे महत्व विशद केले, कार्यक्रमातुन माजी विद्यार्थ्यानी शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रिडा साहित्य भेट म्हणुन दिले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्वासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी किशोर टकलै, डिंगबर पाटील, जावेद खाटीक, मनोज गागुर्डे, धरती पाटील, मंदाकिनी पाटील, गुलाब चौधरी, सुनंदा राठोड, पदमसिंह शिंदे, इम्रान मिर्झा, विकास माळी, नंदकिशोर सैंदाणे, संजय ह्याळीगै रवीकिरण मोरे, रवी जोशी, शफी सय्यद, शरद अक्कर, सुमित्रा मिस्तरी, शालीनी सुर्यवंशी, जावेद सय्यद यांच्यासह 1994/95च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.













