६५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या वकीली व्यवसाय करणारे विधीज्ञ यांना प्रतिमहा १० हजार पेंशन चालू करण्याची मागणी

फलटण प्रतिनिधी :- ज्यांचे ६५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या वकीली व्यवसाय करणारे विधीज्ञ यांना प्रतिमहा कमीत कमी १० हजार पेंशन चालू करण्याची मागणी फलटण बार असोसिएशन चे अध्यक्ष बापूसाहेब सरक यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चेअरमन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, आमदार सचिन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी फलटण व ईतर मान्यवर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संपूर्ण राज्यामध्ये आपले सरकार अतिशय कर्तव्यदक्ष असून आपल्या कल्पनेतून अतिशय लोकहिताच्या योजन्या कार्यान्वित झालेल्या आहेत. आमचे संपूर्ण महाराष्ट्रातील वकील बांधव हे वर्षानुवर्षे महाराष्ट्रात वकीली व्यवसाय अतिशय इमाने इतवारे कोर्टात करत असतात वकील यांना त्यांचे वयाचे ६५ वर्षानंतर वरेच आजारांना सामोरे जावे लागते. तसेच इतर दैनंदिन जीवनांमध्ये आर्थिक मदतीची आवश्यकता भासत असते.

आपला महाराष्ट्र ही संतांची भुमी असून प्रत्येक व्यक्तीच्या कार्याची दखल वेळोवेळी घेतलेली आहे, असे आपला इतिहास आहे वकील हे इतिहासामध्ये प्रत्येक वेळी देशाचे हितासाठी लढले आहेत सबब आपण कर्तव्यदक्ष, आदरणीय मुख्यमंत्री म्हणून आपल्या वकीलांच्या हिताचा ठोस निर्णय घेऊन सर्व महाराष्ट्रतील जेष्ठ वकिलांना आनंदाची परवणी दयाल अशी अपेक्षा करतो वकीलांची पेंशन लवकरात लवकर प्रतिमहा कमीत कमी १० हजार पेंशन चालू कराल याचीही हमी व खात्री आमचे तमाम वकिल बांधवांना आहे.तरी आपण आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊन जेष्ठ वकीलांसाठी प्रतिमहा कमीत कमी १० हजार पेंशन योजना चालु करावी असे निवेदन फलटण बार असोसिएशन चे अध्यक्ष श्री. बापूसाहेब सरक यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी फलटण बार असोसिएशन चे अध्यक्ष श्री. बापूसाहेब सरक, ॲड. शारदा दीक्षित, ॲड. पूनम करपे, ॲड. प्रशांत निंबाळकर निवेदन देताना उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal