झाडाची फांदी विद्युत तारांवर कोसळल्याने खळबळ; थोडक्यात बचावली ११ वर्षीय बालिका

झाडाची फांदी विद्युत तारांवर कोसळल्याने खळबळ; थोडक्यात बचावली ११ वर्षीय बालिका

 

चाळीसगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव शहरातील करगाव रोड परिसरात आंब्याच्या झाडाची कटाई करताना निष्काळजीपणा झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेत मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. येथील डॉक्टर पुष्कर घाटे यांच्या घराच्या आवारातील आंब्याच्या झाडाची कटाई सुरू असताना तोडलेली फांदी अचानक विद्युत तारांवर पडल्याने जोरदार कडकडाट झाला. या घटनेमुळे विद्युत तारांखालून जात असलेली ११ वर्षीय बालिका घाबरून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित झाडाची कटाई करण्यापूर्वी आवश्यक शासकीय परवानगी घेण्यात आली होती का, तसेच महावितरण कंपनीला याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली होती का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना एक मोठी फांदी थेट विद्युत तारांवर कोसळली. त्यामुळे तारांमध्ये स्पार्किंग होऊन मोठा कडकडाट झाला आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी विद्युत तारांखालून एक ११ वर्षीय बालिका जात होती. अचानक झालेल्या आवाजामुळे आणि ठिणग्या उडाल्याने ती घाबरून तळमळ करत पळू लागली. स्थानिक नागरिकांनी तिला धीर देत सुरक्षित ठिकाणी नेले. फांदी पडल्याने विद्युत तार तुटली असती किंवा तारांचा संपर्क जमिनीशी आला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेनंतर बालिकेचे वडील गणेश अग्रवाल यांनी संबंधित विभागांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झाडाची कटाई करताना नियमांचे पालन करण्यात आले होते का? आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का? आणि या घटनेत माझ्या मुलीच्या जीवाला काही धोका निर्माण झाला असता तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गणेश अग्रवाल यांनी याबाबत संबंधित विभागांकडे लेखी तक्रार दिल्याचे समजते. तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाकडून प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली आहे .

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें