साखरवाडी – पिंपळवाडी येथे जि. प. शाळेचा ‘प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे स्वागत करून मोफत शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप!
फलटण प्रतिनिधी
साखरवाडी – पिंपळवाडी:येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत करण्यात आले. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.रूपालीताई सरगर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रूपालीताई लक्ष्मण सरगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके आणि नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले. नवीन गणवेश आणि हातात रंगीबेरंगी पुस्तके आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छाया सोहळ्याला पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, युवा नेते शंभुराज सरगर, विशाल भोसले, सिद्धांत सरगर, राम कोलवडकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.हा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या पहिल्याच दिवशी रांगोळी काढून सजवलेल्या आवारात झालेल्या या उत्साही वातावरणामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.












