प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह,सातारा(डी.सी. सी. हॉल ) या ठिकाणी रंगला 60 कलाकारांच्या संचात ‘भारत पर्व’

सातारा 26: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारत पर्व या मराठी हिंदी देशभक्तीपर गीत – नृत्यचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह,सातारा(डी.सी. सी. हॉल ) या ठिकाणी केले गेले . या कार्यक्रमाची संकल्पना मा. सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ॲड.नाम .आशिष शेलार यांची असून, श्री विकास खरगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून : 

1) श्री. नागेश पाटील सर ( RDC )

2) श्री.अभिजीत बापट ( सी ओ सातारा नगरपरिषद )

3) श्री अभिजीत यादव ( PSI )

4) श्री. मनोज शेंडे ( उपनगराध्यक्ष सातारा नगरपरिषद सातारा)

5) सौ कोळेकर मॅडम (शालेय शिक्षणाधिकारी सातारा)

6) सौ शबनम मुजावर 

7) श्री.राहुल मगदूम ( अभिनेता )

8) श्री. पंकज चव्हाण ( सांस्कृतिक प्रकाश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा)

9)श्री.वैभव कदम ( कॉन्स्टेबल मंजू सिरीयल मधील अभिनेते )

10) श्री. हरीश पाटणे ( जिल्हा पत्रकार संघटना अध्यक्ष सातारा)

उपस्तित होते या कार्यक्रमातील सर्व कलाकारांना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री विभीषण चवरे यांनी शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमांमध्ये भार्गव कांबळे ( ढोलकी झाली बोलकी महाराष्ट्र विजेते ) , प्रदीप जिरगे , मंदार कदम शिवाजी सुतार , यशपाल देवकुळे वैदही जाधव, वेदर सोनुले असे नामवंत गायक गायिका सहभागी होणार असून सतीश कुलकर्णी यांच्या निवेदनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे देशभक्तीपर नृत्य – गीते सादर झालीत,विशेष आकर्षण म्हणून वंदे मातरम या गीतावर कार्यक्रमाची नृत्यद्वारे सांगता झाली. या कार्यक्रमा साठी संगीत संयोजन महेश सोनुले व वेदा सोनुले यांनी केल. तर नृत्याविष्कार चंद्रकांत पाटील आणि समूह यांचा होता.

 कार्यक्रमाचे आभार जानव्ही जानकर ( अधीक्षक, पुणे विभागात, संस्कृतीक कार्य विभाग) यांनी केले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal