लग्नाचे आमिष दाखवून पैशाचा गंडा घालणाऱी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात.

लग्नाचे आमिष दाखवून पैशाचा गंडा घालणाऱी टोळी फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात.

 फलटण प्रतिनिधी : पोलीस ठाणे, गु. र. नं. 92/2025, भा. न्या. सं. 2023 चे कलम 318(4), 61(2), 54 हा गुन्हा दि. 28/01/2025 रोजी दाखल आहे. त्यामधील फिर्यादी हे अविवाहीत पुरुष असुन त्यांचे वय 44 वर्ष आहे. ते व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे त्यांचे लग्न आतापर्यंत जमले नाही. लग्न जमण्यासाठी ते प्रयत्न करीत असताना त्यांचे ओळखीचे बट्टु गोरे, रा. कुरवली, ता. फलटण यांनी त्यांना छाया साठे रा. आळंदी, जि. पुणे या महिलेचा फोन नंबर देऊन सदरची महिला ही लग्न जुळविण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी छाया साठे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर छाया साठे व तिची साथीदार जयश्री दत्तु शिंदे, रा. चिखली, ता. हवेली, जि. पुणे यांनी फिर्यादीच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने दोन मुले व विवाहीत असलेल्या दिपाली प्रभु जाणे, रा. पाटणादेवीरोड, रोशननगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव या महिलेशी संगनमत करुन तिचे फिर्यादी यांचेशी लग्न अगस्ती मंगल कार्यालय, आळंदी, जि. पुणे येथे लावुन दिले. त्या मोबदल्यात त्यांनी फिर्यादी यांच्याकडुन एकुण 2,75,000/- रु. रोख स्वरुपात घेतले होते. हे करीत असताना छाया साठे व जयश्री दत्तु शिंदे यांनी त्यांची साथीदार दिपाली प्रभु जाणे हीस दोन मुले व विवाहीत असल्याचे फिर्यादीस लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी कळवुन तेथुन निघुन येण्यास सांगितले होते. त्यानुसार दिपाली प्रभु जाणे ही लग्नानंतर 6 दिवसातच फिर्यादीस खरी हकिकत सांगुन तेथुन निघुन गेली.

फिर्यादीस फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जयश्री दत्तु शिंदे व छाया साठे यांना पैसे मागितले. त्यावर या दोघींनी त्यांना मुलगी दाखविते असे सांगुन त्याकरीता आणखी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यास फिर्यादीने तयारी दर्शविल्यानंतर त्यांचेत चर्चा होऊन दि. 27/01/2025 रोजी जयश्री दत्तु शिंदे ह्या शशिकला तुकाराम जाधव, रा. चिखली, ता. मंगळरुपीर, जि. वाशिम यांना नवरीमुलगी म्हणुन घेऊन फलटण येथील एस. टी. स्टॅण्डवर आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गजानन नामदेव डाखोरे, सुमित्रा गजानन डाखोरे व गोकुळ ज्ञानदेव लोंढे, रा. तांदुळवाडी, ता. जि. सोलापूर हे उपस्थित होते.

फलटण एस. टी. स्टॅण्डवर फिर्यादी गेल्यानंतर वरील व्यक्ती ह्या नवरी मुलीचे खोटे नातेवाईक बनुन पुन्हा वरील प्रकारे फसवणुक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरची बाब पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांना कळविल्यानंतर तात्काळ पोलीसांचे पथक फलटण बसस्थानकात जाऊन वरील आरोपींना ताब्यात घेऊन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. त्यामध्ये एकुण पाचजणांना अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे ह्या करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल धस सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, दिपक पवार, पोलीस अमंलदार तुषार आडके, अमोल अडसुळ यांनी केली आहे.
चौकट
*सध्या ग्रामीण भागात स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण विषम असुन पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे केवळ शेती करणा-या व नोकरी नसणा-या युवकांची लग्न जमण्यास अलिकडील काळात अडचण निर्माण होत आहे. नेमक्या याच अडचणीचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणुक करुन पैसे लुबाडण्याचा नवीन फंडा निघाला आहे. वरील घटनेतील आरोपींचे फोटो खालील तक्त्यामध्ये लावले असुन यांच्यापैकी कोणी लग्न लावुन देण्याचे आमिष दाखवुन कोणाची फसवणुक केली असल्यास त्यांनी तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस संपर्क साधावा.

*

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें