चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे अनोखे उपक्रम; महिला ग्राम सभेत महिलांना सॉनेटरी पॉड वाटप

चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे अनोखे उपक्रम; महिला ग्राम सभेत महिलांना सॉनेटरी पॉड वाटप

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव ) :

विविध सामाजिक उपक्रम राबवून नेहमी चर्चेत असणाऱ्या चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने महिला ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती, यावेळी ग्रामपंचायतीने विशेष उपक्रम राबविला, या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतिचा दहा टक्के निधी खर्चून महिलांना मोफत सॉनेटरी पॉड उपलब्ध करून दिले. चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून महिला बालकल्याणाचे दहा टक्के रक्कम खर्चून गावातील 200 हून अधिक महिलांना मोफत सॉनेटरी पॉडचे वाटप करण्यात आले दि. 20 रोजी सकाळी 8 वा हा वाटपचा कार्यक्रम पार पडला, सरपंच अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड यांच्या हस्ते महिलांना या पॅडचे वाटप करण्यात आले, तत्पूर्वी या अभिनव उपक्रमाबाबत ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत असून गेल्या पाच वर्षांपासून या ग्रामपंचायतीने यशस्वी वाटचाल केली आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातून ही ग्रामपंचायत अग्रेसर राहिली आहे. या कार्यक्रमाला विकासो माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, तारा बाई, कडू बाई, अरुणा बाई, रुखमा बाई, वत्सला बाई, विमल बाई, मुक्ताबाई, सुशीला बाई, शेवंताबाई, ताई बाई, तेजलिबाई, मलीबाई, हाऊसिबाई यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें