मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते आपल्याकडे ठेवत अखेर खातेवाटप जाहीर,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते व गृहनिर्माण,तर अजितदादा यांच्याकडे अर्थ खाते जैसे थे
पहा संपूर्ण यादी,
मुंबई:- खातेवाटपाशिवाय विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतेने खातेवाटप जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद आपल्याकडे ठेवल आहे . तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदे कडे नगर विकास आणि गृहनिर्माण खात देण्यात आला आहे. फडणवीस सरकारने 5 फेब्रुवारीला शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला . पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झालं नव्हतं नागपूरचं हिवाळी अधिवेशनही खातेवाटपाशिवायच झालं .मात्र अखेरच्या दिवशी खाते वाटप करण्यात आला आहे .
पहा खातेवाटप यादी खालील प्रमाणे:
कॅबिनेट मंत्री
1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास )
3.हसनमुश्रीफ -वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्र शिक्षण ,संसदीय कामकाज मंत्री
5.गिरीश महाजन -जलसंधारण (विदर्भ तापी कोकण विकास ),आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील -पाणीपुरवठा
7.गणेश नाईक -वन
8.दादाजी भुसे -शालेय शिक्षण
9.संजय राठोड -माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगल प्रभात लोढा- कौशल्य विकास रोजगार उद्योग संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल- विपणन प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे- पर्यावरण व वातावरण बदल ,पशु संवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नूतनीकरण
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई- पर्यटन खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार- माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्यांक विकास व अौकाफ मंत्रालय
20.आदिती तटकरे -महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले- सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे -कृषी
23.जयकुमार गोरे -ग्रामविकास ,पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ -अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे -कापड
26. संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक वाहतूक
28.भरत गोगावले रोजगार हमी ,फलोत्पादन
29.मकरंद पाटील -मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे -मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर -कामगार
32.बाबासाहेब पाटील- सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री(State Ministers)
34.माधुरी मिसाळ -सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ ,मंत्रालय वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल -अर्थ आणि नियोजन विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर- सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा
37. इंद्रनील नाईक- उच्च आणि तंत्र शिक्षण ,आदिवासी विकास आणि पर्यटन
38.योगेश कदम -गृहराज्य शहर
39.पंकज भोयर -गृहनिर्माण ,










