ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्र शहरातून कार्यरत;ग्रामस्थांची ससेहोलपट

ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्र शहरातून कार्यरत;ग्रामस्थांची ससेहोलपट

बाळू वाघ प्रतिनिधी

ग्रामीण भाग:शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच विविध दाखले आणि दाखले मिळावेत यासाठी ‘महा-ई-सेवा केंद्र’ सुरू केले खरे, मात्र अनेक केंद्रांचे चालक चक्क शहरी भागातून आपला गाशा चालवत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामीण जनतेला साध्या दाखल्यासाठीही शहराची वारी करावी लागत असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नियमांची पायमल्ली: मंजुरी ग्रामीण भागासाठी असताना, सोयीसुविधांकेंद्रचालक शहरात बसून काम करत आहेत.

नागरिकांना आर्थिक भुर्दंड

शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी भाडे खर्च करून शहरात जावे लागत आहे.

वेळेचा अपव्यय एका दिवसाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना अनेक चकरा माराव्या लागत आहेत.

ग्रामस्थांची मागणी

शासनाने या केंद्रचालकांवर तात्काळ कारवाई करावी आणि महा-ई-सेवा केंद्रे मूळ गावातच सुरू करण्याचे बंधन घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन ग्रामीण जनतेची ही गैरसोय थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें