५ हजारांची लाच मागणाऱ्या म्हसवडच्या महिला पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी

अपघाताच्या गुन्ह्यात जप्त केलेली गाडी सोडून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार निता नारायण पळे यांच्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये त्यांची मारुती सुझुकी ओम्नी कार पोलिसांनी जप्त केली होती. ही जप्त केलेली कार पुन्हा मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात तपास अधिकारी असलेल्या निता पळे यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
​याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ७ जानेवारी २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान पळे यांनी पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि सातारा एसीबीचे पोलीस उप-अधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, सुनील पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सातारच्या एसीबी विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित विभागाच्या कार्यालयीन क्रमांकावर किंवा हेल्पलाईन १०६४ वर संपर्क साधावा.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal