अखेर सहा वर्षांनी सरन्यायाधीश गवईंकडून गुपित उघड

अखेर सहा वर्षांनी सरन्यायाधीश गवईंकडून गुपित उघड

👉 देशाचे ५२वे सरन्यायाधीश  म्हणून नियुक्ती.

👉 बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित कार्यक्रमात न्या. गवई यांचा खुलासा . 

मुंबई / चक्रधर मेश्राम –  

सहा वर्षांनी सरन्यायाधगवईंकडू अखेर ते गुपित उघड झाले. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून २०१९ मध्ये आपल्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी, तत्कालीन न्यायवृंदातील एक न्यायमूर्ती आपल्या बाजूने नव्हते, असा खुलासा देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी सत्कार समारंभात बोलताना केला. तसेच, सहा वर्षांनंतर आपण हा खुलासा करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

देशाचे ५२ वे सरन्यायाश म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायमूर्ती गवई यांनी उपरोक्त खुलासा केला. गेल्या सहा वर्षांपासून आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहोत. तथापि, आतापर्यंत हे गुपित आपण कधीही उघड केले नव्हते, असे सांगताना न्यायवृंदातील त्या न्यायमूर्तींचे नाव मात्र सरन्यायाधीशांनी यावेळी उघड केले नाही.

सरन्यायाधीश नेमके काय म्हणाले ?

सर्वोच्च न्यायालयात आपल्या नावाची शिफारस केले गेली. त्यावेळी, न्यायवृंदातील एका न्यायमूर्तींना आपल्या नावाबाबत काही शंका होत्या.आपल्याला सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली तर मुंबईतील काही वरिष्ठ वकिलांमध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, असे त्या न्यायमूर्तींना वाटत होते. तथापि, बॉम्बे बार असोसिएशनच्या अनेक वरिष्ठ वकिलांनी दिल्लीत या न्यायमूर्तींची भेट घेतली आणि त्यांची आपल्याबाबत चुकीची धारणा असल्याचे त्यांना पटवून दिले. या वकिलांच्या प्रयत्नांमुळेच आपली सर्वोच्च न्यायालयात बढती झाली आणि आज आपण देशाच्या सरन्यायाधीशपदी आहोत. बॉम्बे बार असोसिशनच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आणि आपण त्यासाठी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू, अशी भावना गवई यांनी यावेळी व्यक्त केली.

आपण काय केले हे सहा महिन्यानंतरच उघड होईल. 

न्याय करणे आणि घटनेचे पालन करणे हे न्यायमूर्तीचे प्रमुख कर्तव्य आहे यावर सरन्याधीशांनी यावेळी भर दिला. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिल्याचेही न्यायमूर्ती गवई यांनी सांगितले. सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आपण माध्यमांना कोणत्याही मुलाखती देण्यास किंवा सहा महिन्यांतील आपल्या कृती आराखड्याबाबत बोलण्यास नकार दिला. तथापि, आता बोलण्याऐवजी, सहा महिन्यांनंतर निवृत्त झाल्यावर आपण किती काम केले आणि त्यातून अपेक्षित साध्य केले की नाही हे कळेलच. पोकळ आश्वासने आपण देऊ इच्छित नाही आणि कोणत्याही निराशेला जागा देऊ इच्छित नाही, असेही गवई यांनी यावेळी स्पष्ट केले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal