चाळीसगाव येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण

चाळीसगाव येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

सकल खान्देश कुणबी मराठा समाज तसेच हनुमान वाडी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर मित्र परिवार तर्फे आज दि.६ रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शहरातील खरझई रोडवरील स्मशान भूमी परिसरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान मराठा समाज व पिंपळेश्वर महादेव मंदिर मित्र परिवारने केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी खान्देश कुणबी मराठा समाजाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मोनाली क्लासेसचे संचालक नाना पाटील सर, सचिन पवार, सुधीर, पाटील, संदीप जाधव, प्रदिप मराठे, सचिन गायकवाड, निलेश गवळी, स्वप्नील राखुंडे, सुरेश राजपूत, विजय शिंदे, किशोर पवार, दिनेश भोसले, अभिजित राखंडे, संतोष सोनार, रणधीर जाधव यांच्यासह समाज बांधव व महिला समाज बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें