धुळ्यात पहाटेचा थरार: मंदिरात चोरी करणारा रंगेहाथ जेरबंद; पोलिसांच्या तत्परतेने १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

धुळ्यात पहाटेचा थरार: मंदिरात चोरी करणारा रंगेहाथ जेरबंद; पोलिसांच्या तत्परतेने १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे 

धुळे शहरातील दसरा मैदान परिसरातील पूर्वमुखी हनुमान मंदिरात पहाटे चोरी करून पळणाऱ्या एका चोरट्याला शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत रंगेहाथ जेरबंद केले आहे. १६ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ‘डायल ११२’ वरून माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जागरूक नागरिक सचिन वाडीले यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भुयारी रेल्वे बोगद्याकडे पळणाऱ्या समीर शाह याला अंधारात पाठलाग करून पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली दानपेटी, चांदीचा मुकुट आणि चांदीचे तोडे असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे व उपनिरीक्षक नितीन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकातील अंमलदार रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, राहुल सरदार, सचिन जैतपुरे, रोहिणी पवार, अमोल पगारे, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, अमित रनमळे, धम्मपाल वाघ, योगेश वानखेडे आणि शाहीद शेख यांनी अत्यंत सतर्कतेने या गुन्ह्याची उकल केली. नागरिक आणि पोलिसांच्या या संयुक्त तत्परतेमुळे अवघ्या काही मिनिटांतच चोरीचा छडा लागल्याने धुळेकरांमधून पोलिसांच्या कार्यतत्परतेचे मोठे कौतुक होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें