कारवाईचे बोर्ड लावलेले असतानाही नागरिक कचरा टाकताना मनपा कारवाई शून्य
नाशिक प्रतिनिधी: सचिन देवरे
सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये नक्की काय चालू आहे. नाशिककरांना खड्ड्याचा सामना करावा लागत असतानाच आता सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग ज्या ठिकाणी सूचना फलक लावलेले असताना सुद्धा सर्रासपणे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे त्यातच एक उदाहरण आज पाटील नगर नाईक मळा सिडको जवळ पाहायला मिळाले. रहिवाशी एरियामध्ये सर्रासपणे कचरा टाकला जात असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत असेच एक घटना विखे पाटील शाळा एरिया स्वीट ्स दुकानाच्या बाजूला पाहायला मिळाली सूचनाफलक लावलेला असताना सुद्धा सर्रासपणे कचरा टाकताना आपण एक व्यक्तीला पाहत आहोत तर जागरूक नागरिकांनी सदर व्यक्तीला कचरा उचलायला भाग पाडले मग काय जागोजागी महानगरपालिकेने ओला कचरा सुका कचरा अलग अलग करण्यासाठी हरित नासिक उपक्रम लाभला मग तो फक्त कागदोपत्रीच का हे त्याचे जिवंत उदाहरण नाशिककरांना पावसाळा चालू झाला आता डेंगू मलेरिया टायफाईड डासाची उत्पत्ती आणि दुर्गंधी ही कधीही पसरू शकते म्हणून सावधान रहा दक्ष नागरिक सचिन नाईक यांनी पुढाकार घेऊन सदर व्यक्तीला कचरा उचलण्यास भाग पाडले मग नाशिक महानगरपालिका नक्की नाशिक मधून कचरा उचलते का नाहीतर जनतेने निवडून दिलेले प्रभाग प्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन सदर बाब लक्षात घेऊन पालिकेसमोर प्रश्न मांडावा.













