प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले स्मारकाला तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात मान्यवरांचा सत्कार

प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले स्मारकाला तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात मान्यवरांचा सत्कार

सातारा, दि. ५ : सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य शासनाने किल्ले प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली असून, स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी मार्गी लागली आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज सातारा येथे सकल नाभिक समाज आणि सातारा जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शंभूराज देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शासनाचे तसेच या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून स्मारकाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व संबंधित सर्वांचे आभार व्यक्त केले. शूरवीर जिवाजी महाले यांच्या कार्याला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत समाजबांधवांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सातारा जिल्ह्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने नाभिक समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांनी शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नाभिक समाजाच्या वतीने व्यक्त केली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें