विडणी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दशरथ बनकरला २० वर्षे सश्रम कारावास; फलटण न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

विडणी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दशरथ बनकरला २० वर्षे सश्रम कारावास; फलटण न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

फलटण प्रतिनिधी

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मे २०१८ मध्ये घडलेल्या एका धक्कादायक बलात्कार प्रकरणात सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत कठोर निर्णय दिला आहे. न्यायालयाने ३८ वर्षीय आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ बबन बनकर (वय ३८, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे सजा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मे २०१८ मध्ये एका पीडितेवर अत्याचार केला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३३२/२०१८ नुसार भादंवि कलम ३७६, ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.८ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर निकालतत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोळ यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते. माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी. जी. भोसले यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारी पक्षातर्फे ॲड. मिलिंद ओक आणि ॲड. वैभव काटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यादरम्यान एकूण ०८ साक्षीदारांची साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.न्यायालयाने सुनावलेली शिक्षा:२० वर्षे सश्रम कारावास५०० रुपये दंड (दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद)पोलीस पथकाची कौतुकास्पद कामगिरीदीर्घ काळ चाललेल्या या खटल्यात आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडूकर, आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. धन्यकुमार चांगदेव गोडसे यांच्या सूचनेनुसार फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने चोख कामगिरी बजावली.या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोळ, कोर्ट पैरवी अंमलदार मपोहवा २१२९ नेवसे, मपोहवा २०८५ कदम, पोहवा २१७ भोसले, आणि मपोकॉ १६११ गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या निकालामुळे पीडितेला अखेर ८ वर्षांनी न्याय मिळाला असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें