फलटण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ऐतिहासिक निर्णय; डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक मार्गाला ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ नाव

फलटण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ऐतिहासिक निर्णय; डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक मार्गाला ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ नाव

फलटण, दि. ३ जुलै : फलटण शहरातील अध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी आणि संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांच्या पवित्र कार्याचे स्मरण पुढील पिढीला राहावे, यासाठी नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक या रस्त्याला आता ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ असे अधिकृत नाव देण्यात येणार आहे. या रस्त्याला नाव देण्याबाबत विजय उपळेकर यांनी पालिकेकडे अर्ज केला होता, ज्यावर विचारविनिमय करून हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांनी फलटणच्या अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ते पेशाने डॉक्टर असतानाही त्यांना दैवी शक्ती प्राप्त होती, ज्याद्वारे त्यांनी अनेक भक्तांचे कल्याण केले. त्यांच्या या महान कार्याची दखल घेत पालिकेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या नामांतराबाबत प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण शहराला मोठा अध्यात्मिक वारसा लाभला आहे. संत उपळेकर महाराजांचे कार्य पुढच्या पिढीला आणि शहरात येणाऱ्या नागरिकांना कळावे, या उद्देशाने हा रस्ता आता त्यांच्या नावाने ओळखला जाईल. नामांतराचा हा निर्णय शहराच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें