मानीकगड माईन्स प्रशासनाची मनमानी . प्रशासन हतबल अवैध गेट ताले तोडून सार्वजनिक रस्ता खुला

मानीकगड माईन्स प्रशासनाची मनमानी .

प्रशासन हतबल अवैध गेट ताले तोडून सार्वजनिक रस्ता खुला

[कोरपना प्रतिनिधि ] 

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगडसिमेंटच्या गडचांदुर स्थित सिमेंट प्रकल्पाचे बोकूडडोह कुसुंबी माईन्स येथे कंपनीची चुनखडी खदान आहे उपरोक्त खदान ही जिवती राजुरा सीमेवर असल्याने दोन्ही तालुक्याच्या सीमा हद्दी रेषेच्याच्या बाउंड्रीवर आहे नोकारी बु बाम्बेझरी हे राजुरा तालुक्यात तर चुनखड्डी माईन्स जिवती qतालुक्यात आहे कंपनीने १७ । ऑगष्ट १९ ८१ मध्ये ६४३-६२ हेक्टर जमीन भाडेतत्वावर महाराष्ट्र शासनाने लिजवर दिली मात्र लिज करारात गडचांदूर नोकारी कुसुंबी आसापूर रस्ता दिला नसत्याचे करारात स्पष्ट नोंदी असून हा निस्तार हक्काचा सार्वजनिक रस्ता राहील असे असताना कंपनीने ३३ मीटर साखळी रस्त्यावर ४ ठिकाणी अनाधिकृत लोखंडी गेट बसवून रस्त्यावर अडथळा निर्माण केला असत्याने 2020 मध्ये तत्कालीन तहसिलदार होळी यांनी आदेश पारीत करुण रस्ता खुला करावा पर्यायी रस्त्याच्या दुतर्फा स्वताःचे सुरक्षितता कंपनीने करावे असे आदेश पारीत केले कंपनीने या वर अपिल उपविभागीय अधिकारी यांचे कडे केले असता अपिल खारीज करुण तहसिलदाराचे आदेश कायम ठेवित दि २९ / १२ / २०२२ पारीत केला यावर कंपनीने अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे नव्याने अपिल दाखल केली अप्पर जिल्हाधिकारीयांनी अपिल स्वीकृत करुण उपविभागीय अधिकारी यांचाआदेश रद्द करुण दि १६ /११ / २०२३ ला उपविभागीय अधिकारी यांनी फेर चौकशी करूण नव्याने आदेश करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजूरा यांना आदेशीत केले मात्र ३ वर्ष लोटून सुद्धा फेरआदेश करण्यास वेळ भेटला नाही जनतेला होत असलेला त्रास व रस्त्याचा प्रश्न सुटला नसलयामुळे दि २१ / ५ / २०२६ ला तहसिलदार राजुरा / जिवती पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन ३० मे पर्यंत रस्ता खुला करण्यात यावा अन्यथा आंदोलन करुण जनता रस्ता खुला करेल असा उल्लेख निवेदनात होता तहसिलदार यांनी दखल घेत दि २५ मे २०२६ ला अवैध सिमेंट खांब गाडून तारेचे कुंपन कंपनी क्षेत्राच्या बाहेर शेतात केल्याचे पंचनाम्यात नमूद केले तर मंडल अधिकारी चव्हाण ग्राममहसुल अधिकारी जाधव यांनी दि २८ मे 2026 रोजी भेट दिली असता रस्त्यावर २० – २५ सुरक्षा रक्षक यांनी गेट बंद करूण येणाऱ्या जाणारी वाहने अडवित मनाई करीत असल्याचे व गेट ला लोखंडी साखळी कुलूप लावून बंद केल्याचे दिसून आले यामुळे १५ – २० गावाचा रस्ता कंपनी नियमबाह्य मुजोरी दहशत सुरक्षा रक्षकाचा बळावर नागरीकाना अडवित वाहतुकीस अडथळा निर्माण करत असताना तथा खुद पोलीसअधिकाऱ्याचे वाहन पेट्रोलिंग जाताना अडवून ठेवित मनमानी चा अनुभव पोलीसाना आला हा भाग आदिवासी बहुल असल्याने रात्रौ अपरात्रौ एखाद्या रुणाला नेण्यास सुद्धा अडसर आहे आंदोलन कर्त्यावर पोलीसानी ८ -१० गुन्हे दाखल केले कंपनीचा खाजगी रस्ता नसताना कंपनींची मनमानी अनधिकृत कब्जा अवैध बांधकाम करुण लोकाना अडविण्याचा ताळे ठोकण्याचा प्रकरण गंभीर असताना पोलीसाकडे शेकडो तक्रारी असताना कंपनी व्यवस्थापनावर का कार्यवाही होत नाही ज्या आदिवासी ची लिज करारात कुप न ६० व सव्हे न ४ /2 ४ / ३ समावेश नसताना सदर प्रकरण नागपूर खंडपिठात प्रलंबित व स्वताः जिल्हाधिकारी कंपनीने विविध आयोग व न्यायालयात शपथपत्र देऊन रक्कम मोबादला १९८४ – ८५ मध्ये दित्याचा दावा केला मग कोनत्याही सक्षमप्राधिकरणाचे आदेश नसताना २८ हेक्ट ६२ आर जमीनीचा मोबादला मार्च २०२६ मध्ये देण्याची पाळी कंपनीवर का आली “दाल मे कुच्छ काला है .. *जिल्हाधिकाऱ्याची* *बैठक* *व* *आदेश* ** *जमीन* ** *मोजणीची* *फी* *कंपनीने* *भरलीच नाही* दिनांक 29 एप्रिल 2026 ला जिल्हाधिकारी यांनी मानीकगडसिमेंट कंपनीच्या 18 आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून बैठकीमध्ये तीस दिवसात नोकारी कुसुंबी येथिल कंपनी ताब्यातील मोजणी करण्यात येईल तसेच बाम्बेझरी येथिल पूर्वी मोजणीच्या हद्द व खुणा दाखविण्यात येईल या नुसार दि १८ / ५ / २०२६ पोलीस वनविभाग भूमि अभिलेख महसुल अधिकारी यांचे समक्ष मोजणी करुण खुणा दाखविले शेतकर्याचे नेते आबिद अली यांचे सह आदिवासी कोलाम शेतकरी उपस्थित होते सिमांकन व खुणाच्या जागेवर दगड गाडून हद्द दाखविण्यात आले ती सव्हे न ४३ – ४४ – ४५ ४६-४७ – ४८ ह्या जमीन माईन्स ओव्हर बर्डन लागून कंपनीच्या सिमांकन हद्दीच्या आत निघाले जी जमीन कोलामाची आहे नियमबाह्य कंपनीने तिथे रस्ता करूण बडकावील्याचे उघड झाले असताना दि २६ जुन २०२५ ला नविन कौशिक नावाच्या अधीकारी लेखी पत्र देऊन मोजणी शुल्क भरण्यास कंपनी तयार आहे असे पत्र देऊन सुद्धा कंपनीने मोजणी फी का भरली नाही जिल्हाधिकारी यांचे आदेशानूसार ३० दिवस लोटले परंतु मोजणी झाली नसल्याने आदिवासीनी आंदोलनाचा इशारा देत माझी जमीन माझी शेती कामाला सुरुवात करेल व नव्याने वाद विकोपाला जाईल अशी परीसरात असंतोषाची लाट उसळली आहे कंपनी अडवणुक हा आम रस्ता नाही हे फलक गेटला ताळे लावून होत असलेली वाहतुक बंद करणे ही बाब गंभीर अ असून जनतेला वेढीस धरण्याच्या प्रकरणात मुकेश गहलोत नविन कौशिक अवैद सक्सेना महेबुब बाशा मानस बेहडा रॉय राजेश झाडे सचिन गोवारदिपे उद्धव जाधव बालाजी चव्हाण यांचे सह लोकावर लाठी ने मारण्याची धमकी देणाऱ्या सुरक्षा रक्षक तसेच महिला सुरक्षा रक्षक व डिझेल लोखंड चोरी करणाऱ्या गुन्हेगाराना सुरक्षा रक्षक म्हणून कंपनी गुन्हेगाराचा वापर करुण दहशत माजवित असल्याने यांचे वर गुन्हा दाखल करुण कार्यवाही करावी अशी तक्रार पोलीस स्टेशन गडचांदूर यांचे कडे दिली आहे पोलीस काय कार्यवाही करते की कंपनीची पाठराखण करते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें