देवळी आश्रम शाळेचे विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यावर

देवळी आश्रम शाळेचे विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यावर

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-

तालुक्यातील देवळी येथील उत्तमराव पाटील उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी सागर रहासे व शिरीषकुमार खर्डे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट प्रयोगाचे सादरीकरण केल्याने त्यांची वैज्ञानिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येथे विमान प्रवासाने सहलीसाठी नेण्यात आले, व विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाविषयी अधिक माहिती देण्यात आली. विध्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका म्हणून अर्चना मोरे यांची देखील निवड करण्यात आली. हा संपूर्ण अभ्यास दौरा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल चे प्रकल्प अधिकारी अरुण पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, सचिव आदित्य सूर्यवंशी, संचालिका जयश्री सूर्यवंशी, प्राचार्य सतीश पाटील, मुख्याध्यापक तुषार खैरनार तसेच शाळेचे सर्व शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. 

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal