गडचिरोली येथे ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’

गडचिरोली येथे ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’

⭕ ‘उच्चरक्तदाब दिना’निमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

गडचिरोली,(चक्रधर मेश्राम) दि. ३० मे २०२६:-

दिनांक २९ मे २०२६ रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ आणि ‘जागतिक उच्चरक्तदाब दिना’चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (सामान्य रुग्णालय, गडचिरोली) आणि पोलीस विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा उपक्रम मा.एम. रमेश (पोलीस अधीक्षक, गडचिरोली), मा. गोकुल राज जी (अपर पोलीस अधीक्षक, प्रशासन, गडचिरोली) आणि डॉ. वर्षा लहाडे (जिल्हा शल्य चिकित्सक, सा. रू. गडचिरोली) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. 

या शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मौखिक (तोंड) तपासणी, गटचर्चा तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांवर सविस्तर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात तब्बल १५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 चर्चासत्राच्या सुरुवातीला श्री. स्वप्नील इज्जपवार [प्रभारी पोलीस उप अधीक्षक (गृह), गडचिरोली] यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून विशेषतः दूर राहावे, असे आवाहन केले.

डॉ. प्रेरणा राऊत (जिल्हा सल्लागार, NTCP) यांनी तंबाखूमुळे शरीरावर होणारे घातक परिणाम आणि विविध आजारांची माहिती दिली.

 खैरकर (चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ) यांनी व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या मानसिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकला आणि व्यसनमुक्तीसाठी मानसिक सक्षमीकरण किती गरजेचे आहे हे पटवून दिले.

आरोग्य तपासणी व समुपदेशन

चर्चासत्रानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये तज्ज्ञ चमुने मोलाचे सहकार्य केले. श्रीमती रीना मेश्राम (डेंटल हायजिनिस्ट) आणि श्री. खेमचंद वाढई यांनी कर्मचाऱ्यांची मौखिक तपासणी केली. तंबाखूचे व्यसन असलेल्या कर्मचाऱ्यांचे श्रीमती मीना दिवटे यांनी प्रभावी समुपदेशन (Counseling) केले. राहुल चावरे, श्रीमती वैशाली बोबाटे, श्रीमती शीतल काळबांधे आणि भूपेश दरडमारे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची उच्चरक्तदाब (बीपी) व मधुमेह (शुगर) तपासणी केली.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री. नरेंद्र पिवाल [प्रभारी अधिकारी, पोलीस कल्याण शाखा] यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. 

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी.