साखरवाडी पोलिस सिंघम शिवानी नागवडे यांनी अवैद्य देशी दारूवर धाड; ६५ वर्षीय वृद्धाकडून मुद्देमाल जप्त
मुरुम ता.फलटण
फलटण प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे मुरूम येथे अवैध दारू विक्रीवर फलटण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ६५ वर्षीय वृद्धाकडून ‘सखु संत्रा’ नावाच्या देशी दारूच्या एकूण ८४ प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची किंमत ३,३६० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मौजे मुरूम गावच्या हद्दीत अवैध दारूची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. या छाप्यात पोपट मारुती सोनवणे (वय ६५, रा. मुरूम, ता. फलटण) या वृद्धाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ९० मि.ली. क्षमतेच्या ८४ ‘सखु संत्रा’ देशी दारूच्या प्लास्टिकच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.सदर कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या मोहिमेत महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, पोलीस हवालदार (ब.नं. २१४२) पिसे, पोलीस हवालदार (ब.नं. ७३१) अडसूळ, पोलीस हवालदार (ब.नं. ५१६) पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल (ब.नं. २४९२) अमोल देशमुख यांनी थेट सहभाग घेऊन ही यशस्वी कामगिरी केली. या कारवाईमुळे फलटण तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.












