🏆 जावली जोडी मॅरेथॉन २०२६ स्पर्धेत फलटण रनर्सचा डंका!
तीन जोड्यांची दैदिप्यमान कामगिरी; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा!
जावली ता.जावली जि. सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या जावली जोडी मॅरेथॉन २०२६ ( वर्ष ७ वे )स्पर्धेत फलटण रनर्स फाउंडेशन च्या धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत फलटणचा नावलौकिक उंचावला. विशेष म्हणजे या मॅरेथॉन स्पर्धेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून जागतिक स्तरावर फक्त याच ठिकाणी ही स्पर्धा होत आहे. अशा ऐतिहासिक स्पर्धेत फलटणच्या धावपटूंनी मिळवलेले यश ही संपूर्ण फलटणकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या स्पर्धेमध्ये फलटण रनर्स फाउंडेशन च्या तीन जोड्यांनी विविध वयोगटांत यश संपादन करत घवघवीत यश मिळवले.
🥉 35 ते 45 वयोगट
– संदेश गायकवाड आणि आशिष तरडे – तृतीय क्रमांक.
🥈 46 ते 55 वयोगट
– माणिक कांबळे आणि बाळासाहेब शिंगाडे – द्वितीय क्रमांक.
🥉 46 ते 55 वयोगट
– संतोषकुमार बडकडे आणि मारुती चोरमाले – तृतीय क्रमांक.
या यशामागे फलटण रनर्स फाउंडेशन चे अध्यक्ष डॅा. रविंद्र शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच फाउंडेशनचे सदस्य प्रवीण घोरपडे, अमित माने, नानासाहेब काळुखे, आणि इतर सहकाऱ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या सूचना, प्रोत्साहन आणि शुभेच्छा यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे.
धावण्याचा छंद, सातत्यपूर्ण सराव, शिस्त, जिद्द आणि सांघिक भावना यांच्या जोरावर फलटण रनर्स फाउंडेशनने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
फलटण रनर्स फाउंडेशन या उल्लेखनीय यशाचे क्रीडाप्रेमी, धावपटू तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशेष कौतुक होत असून, विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे फलटणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, फलटणच्या धावपटूंच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि सांघिक एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्व यशस्वी धावपटूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
जिद्द, मेहनत आणि एकजूट… हाच फलटण रनर्स फाउंडेशन चा विजयमंत्र!
जय फलटण! जय फलटण रनर्स! 🏃♂️🏆
#फलटणRunners












