अमृत २.० पाणीपुरवठा योजनेत मातीमिश्रित रेतीचा वापर?

अमृत २.० पाणीपुरवठा योजनेत मातीमिश्रित रेतीचा वापर?
👉 रेती वैध की अवैध, हे तपासण्याची तहसीलदारांची जबाबदारी नाही का? कारवाई कधी होणार?
👉 संबंधितांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे. सुट्टीचा दिवस असल्याचे सांगून टाळाटाळ ?
गडचिरोली (चक्रधर मेश्राम) दि.२४/११/२०२६:-
आरमोरी नगर परिषदेमार्फत अमृत २.० योजनेंतर्गत शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र, या कामात वापरण्यात येणारी रेती मातीमिश्रित असून ती विना-रॉयल्टी आणि अवैध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या कामात नेमकी कोणत्या दर्जाची आणि कुठून आणलेली रेती वापरली जात आहे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तथा प्रचार प्रमुख माहिती अधिकार फेडेरेशन महासंघ आणी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची असताना आरमोरीतील सुरू असलेल्या शासकीय कामात वापरल्या जाणाऱ्या रेतीची तपासणी झाली आहे का? तहसीलदारांनी याबाबत नेमकी काय कारवाई केली? की या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत.
तहसीलदारांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रेतीची तपासणी करावी!
रेती वैध असेल तर तिच्या रॉयल्टीच्या पावत्या आणि वाहतुकीचे पास दाखवावेत. रेती अवैध असेल तर संबंधितांवर कारवाई करावी. तसेच मातीमिश्रित रेतीचे नमुने घेऊन तिची गुणवत्ता तपासावी.
शासकीय निधीतून होणाऱ्या कामात कोणते साहित्य वापरले जाते, याची तपासणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरही प्रशासन शांत का आहे? तहसीलदार या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार आहेत की नाही?
याबाबत आरमोरी तहसीलदारांनी तातडीने प्रत्यक्ष स्थळावर जाऊन तपासणी करावी. रेती कुठून आणली, रॉयल्टी भरली आहे का, वाहतुकीचे पास आहेत का आणि रेतीची गुणवत्ता काय आहे, याची चौकशी करून अहवाल जाहीर करावा. अवैध रेती आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी.
शेवटी प्रश्न एवढाच आहे की, सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन अपेक्षित असताना शासकीय योजनेच्या कामात वापरल्या जाणाऱ्या रेतीची वैधता तपासण्याची जबाबदारी कोणाची? तहसीलदारांनी या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष कारवाईतून द्यावे. आता आरमोरीकरांचे लक्ष तहसीलदारांच्या भूमिकेकडे लागले आहे!

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal