मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व विजयी नगरसेवकांचा सत्कार
फलटण- फलटण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले. भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.
सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२.३० रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदन भोसले, धैर्यशील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर व विजयी नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, , रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, मेढ्याच्या नगराध्यक्षा रुपाली वारगडे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.










