अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्गुण खून; तिघांना अटक लाकडे कापण्याच्या मशीन ने केले मृतदेहाचे तुकडे!
फलटण प्रतिनिधी
अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून तिघांनी मिळून एका तरूणाचा अमानुष खून केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी
मौजे सोमंथळी ता. फलटण गावचे हद्दीतील सतीश उर्फ आप्पा दादासों दडस वय २० वर्ष हा युवक मिसिम झाल्याबाबत दिनांक २१/०१/२०२२ रोजी त्यांचा भाऊ सागर दडस यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशम येथे मिसिंग नंबर ११/२०२३, प्रमाणे तक्रार दिली होती
प्रस्तुत मिसिंगमध्ये मिसिंगचा घातपात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून मौजे विडणी गावातील रेखा लक्ष्मण बुधावले हिचे सतिश तुकाराम माने या इसमाबरोबर सुरुवातीला प्रेमसंबंध होते. नंतर तिचे मयत सतिश दडस याचे बरोबर प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्या गोष्टीचा राग मनात धरुन मिसिंग व्यक्तीचा घातपात झाल्याची माहिती प्राप्त झाली.
तपासामध्ये गोपनीय व तांत्रिक माहिती प्राप्त करुन इसामं नामें लखन बंडू बुधावले, सतिश तुकाराम माने याला शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तर देवून काही एक माहिती सांगितली नाही, आम्ही गुन्हा केला नाही असे सांगितले. परंतू पोलीसांनी कौशल्यपुर्व तपास करुन महिला नामे रेश्मा लखन बुधावले हिला ताब्यात घेतल्यावर पोलीसी खाक्या दाखवताच तिने माझे व सतिश दडस याचे प्रेमसंबंधाचे कारणावरुन दिनांक-१४/०१/२०२६ रोजी सतिश उर्फ आप्पा दडस यांचेशी सतीश माने, लखन बुधावले यांचा वाद झाला होता, त्यावेळेस लोखंडी रोडने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते, नंतर तेथून त्यास दवाखाण्यात घेवून जात असल्याचा बनाव करुन विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेहून त्यांचे डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व रात्र झाल्यानंतर तिघांनी मिळून बॉडी लाकूड कापण्याच्या मशीने तुकडे करुन दोन पोत्यामध्ये भरुन साठेगावचे हद्दीत शेततळे व निरा नदीच्या पत्रामध्ये बॉडीचे पोते वेगवेगळ्या ठिकाणी टाकून पुरावा नष्ट केला होता. काल रोजी दाखल झालेल्या मिसिंगच्या तपासावरुन पोलीसांनी अतिशय शिताफीने गुन्हा उघडकीस आणून तीन आरोपींना अवघ्या चार तासांमध्ये अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. तुषार दोशी सो।, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो। अपर पोलीस अधीक्षक, मा. विशाल खांबे सोा, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार संदीप जगताप, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनावळ, सहा. पोलीस निरीक्षक, डी.वी. पथकाचे दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक, शिवानी नागवडे. म. पो. उपनिरीक्षक, पो. हवा. प्रदीप खरात, वैभव सूर्यवंशी, नितिन चतुरे, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, गणेश यादव, संदीप मदने, अमोल चांगण, श्रीनाथ कदम, पो. कॉ. हनुमंत दडस, तुषार नलवडे, गणेश ठोंबरे, शिवराज जाधव, अमोलदेशमुख, सुरज काकडे, अविनाश शिंदे, य यु.आर. पेदाम. म. पो. हवालदार, म.पो. कॉ. गौरी सावंत यांनी मोलाची भूमिका बजावली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.













