भारतीय शेतीला शाश्वत पर्यावरणपूरक विज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल : सचिन यादव

भारतीय शेतीला शाश्वत पर्यावरणपूरक विज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल : सचिन यादव

फलटण : मायकोरिस हे उत्पादन पिकांसाठी ‘ट्रिपल अ‍ॅक्शन’ फायदे देते. यामध्ये मुळांची मजबुती व खोल वाढ, जमिनीतून पोषकद्रव्यांचे अधिक व कार्यक्षम शोषण, तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आणि ताण सहनशीलता वाढविणे या प्रमुख बाबींचा समावेश आह लोकार्पणप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव यांनी फलटण येथील कार्यक्रमात सांगितले.

            भारतीय शेतीला शाश्वत, पर्यावरणपूरक आणि विज्ञानाधारित उपाय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत के. बी. बायो ऑर्गेनिक्स प्रा. लि. यांनी आपल्या नव्या उत्पादनाचे — ‘मायकोरिस’ अधिकृत लोकार्पण केले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे उत्पादन पिकांच्या मुळांच्या आरोग्यास बळकटी देत उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत करणारे आहे.

          के. बी. बायो ऑर्गेनिक्स ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही उत्पादने पुरवत आहे. त्याच अनुभवाच्या जोरावर विकसित करण्यात आलेले मायकोरिस हे पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

कंपनीने याआधी ‘मायकोरिस प्रीमियम’ आणि ‘मायकोरिस’ ही दोन उत्पादने बाजारात उपलब्ध करून दिली असून, शेतकऱ्यांच्या गरजा, पिकांची अवस्था व जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पर्याय देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सर्व उत्पादने उच्च दर्जाच्या संशोधनावर आधारित आहेत.

              पुणे येथे उभारण्यात आलेली कंपनीची उत्पादन युनिट पूर्णत आर ओ सी तंत्रज्ञानावर आधारित असून अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. या युनिटची दररोज सुमारे ७,००० बॉटल्स उत्पादन क्षमता असून देशातील मोजक्या कंपन्यांकडे अशी प्रगत सुविधा उपलब्ध आहे.“मायकोरिसचे लोकार्पण २०२६ या संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय शाश्वत शेती वर्षा’च्या अनुषंगाने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि निसर्गाशी सुसंगत शेती हा आमचा मुख्य उद्देश आहे.”

ते पुढे म्हणाले की, हे उत्पादन लवकरच भारतभरातील १३ राज्यांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, संशोधक तसेच विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारे मायकोरिस हे उत्पादन शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें