शरयुचे मोळी पूजन उत्साहात संपन्न

शरयुचे मोळी पूजन उत्साहात संपन्न

फलटण:- कापशी येथील शरयु ऍग्रो इंडस्ट्रीजच्या ११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यकारी संचालक मा श्री युगेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते आज कारखाना कार्य स्थळावर मोठया उत्साहात पार पडला.

शरयु कारखान्याने गत वर्षी गाळीत झालेल्या ऊसाचे विना कपात एक रकमी बिल शेतकऱ्यांना अदा केले असून सवलतीच्या दरात प्रती टन एक किलो प्रमाणे दिवाळीपूर्वीच साखर वाटप केल्याने शेतकरी वर्गात शरयु विषयी आस्था निर्माण झाली आहे.

संपूर्ण कार्यक्षेत्रात सक्षम तोडणी यंत्रणा हजर झाली असून १ नोव्हेंबर पासून पूर्ण क्षमतेने गाळपास गती येणार आहे.

फलटण खंडाळा वाई जावली सातारा कोरेगाव माण-खटाव माळशिरस इंदापूर बारामती पुरंदर भोर तालुक्यातून शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात ऊस नोंदी केल्या असून शेती विभागाकडून ऊस तोडीचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

शरयुने परिसरात उच्चतम ऊस दर देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा कायम प्रयत्न केला आहे. चालू हंगामात ही ऊसाला सर्वोत्तम दर देण्यात येणार असून आपला संपूर्ण ऊस शरयु ला घालावा असे आवाहन श्री युगेंद्रदादा पवार यांनी केले आहे.

चालू गळीत हंगामात सुमारे १० लाख में टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून आसवनी प्रकल्प तसेच सहविज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे.

कार्यक्रमास संचालक अविनाश भापकर यूनिट हेड विजय जगदाळे दऱ्याचीवाडी येथील विक्रमी ऊस उत्पादक ज्ञानदेव कदम वरिष्ठ विभाग प्रमुख, उप-प्रमुख कर्मचारी बांधव, शेतकरी वाहतूक ठेकेदार, वाहन मालक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार