आता थेट सरपंच ग्रेट पैसा ग्रामपंचायत निवडणुकीत पडणार पैशांचा पाऊस

आता थेट सरपंच ग्रेट पैसा ग्रामपंचायत निवडणुकीत पडणार पैशांचा पाऊस

 फलटण प्रतिनिधी. शिवाजी भोसले

फलटण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असताना अनेक गावांमधून या निवडणुकीच्या बाबतीत चर्चेला उधाण आले असताना गावागावातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे जो तो आत्तापासूनच निवडणुकीची तयारी करत असताना दिसत आहे अनेक गावांमधून आपापल्या प्रभागातून काही उमेदवार आपापल्या पक्षांनी आत्ताच जाहीर करून टाकले असताना गावागावातून गटबाजीला उधाण आले आहे अनेक ठिकाणी गटा गटाने कार्यकर्ते एकत्र येताना दिसत आहेत

 यातच फलटण तालुक्यातील खराडेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक ही मागील राजेगटाची सत्ता होती आता या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन गटांमध्ये चुरशीची निवडणूक रंगणार असल्याचे चित्र बघायला मिळणार असल्याची चर्चा आहे या दोन्ही गटामधून इच्छुक उमेदवार आत्तापासूनच तयारी करताना दिसत आहेत विशेषतः मतदारांचे वाढदिवस या गावांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये लोकप्रतिनिधींच्या कडून आणि ग्रामपंचायतच्या इच्छुक उमेदवारांच्या कडून सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्षपणे साजरे होत असताना फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप अशा सोशल मीडिया वरती जाहिरातीद्वारे प्रदर्शित होत आहेत यामध्ये वाढदिवस साजरा करण्यात दोन्ही गटातून स्पर्धा होत असताना दिसत आहे त्यामुळे सर्वसामान्य मतदारांना वेगळीच किंमत आल्याचीही जनतेला पाहायला मिळत आहे यामुळे तळागाळातील मतदारांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव पडत आहे  

 असे असले तरी निवडणूक लढवताना उमेदवाराची येणाऱ्या काळात चांगलीच दमछाक होताना आपल्याला दिसणार आहे कारण पहिल्यासारख्या निवडणुका राहिल्या नाहीत असे वारंवार नागरिकांच्याकडून बोलले जात आहे काळ बदलल्यामुळे निवडणुका ही स्वस्तात राहिल्या नाहीत यामध्ये पक्षापक्षा मधून गटागटा मधून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार ग्रामपंचायत पातळीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो या आधी सुद्धा अशीच परिस्थिती काहीश्यां निवडणुकांमध्ये झाली आहे असे असताना पैशाशिवाय काम नाही निवडणूक जिंकायची असेल तर वारे माप पैसे खर्च करावे लागणार तरच निवडणुकीला उभे राहावे अशीही चर्चा गावागावातून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये खराडेवाडी गावामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतीला सरपंच पदाची निवड हे थेट जनतेतून होणार असून थेट सरपंचासाठी ग्रेट पैसा लागणार..सरपंच पदाची निवडणूक जिंकताना केवळ पैसा हा केंद्रबिंदू मानला तर या घडीला ही निवडणूक कोणालाच सोपी नाहीअशी चर्चा सध्या तरी आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें