देवकीनंदन सोसायटीत धाडसी घरफोडी, दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने,रोकड लंपास. धुळ्यात चोरट्यांचा धुमाकुळ; पोलिस प्रशासनाची दमछाक

देवकीनंदन सोसायटीत धाडसी घरफोडी, दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने,रोकड लंपास.

धुळ्यात चोरट्यांचा धुमाकुळ; पोलिस प्रशासनाची दमछाक

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.

धुळे शहरातील देवपूर पश्चिम पोलिस ठाणे हद्दीतील देवकीनंदन सोसायटीत चोरट्याने घरफोडी करून दीड तोळे सोनेसह सुमारे 30 हजार रुपयांची रोकड लंपास केली असल्याची घटना उघडकीस आली. या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सिद्धहस्त एक्सिडेंट हॉस्पिटल येथे कार्यरत विकास विनोद पाटील हे देवकीनंदन सोसायटी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दरम्यान, ते आपल्या कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कपाटातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ज्यात माळ, अंगठी, कानातले आदींचा समावेश आहे. तसेच 30 हजाराची रोकड रक्कम चोरून नेली. 

घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वानपथक आणि ठसेतज्ञांना पाचारण करून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत असून, दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर