भोसले दांपत्य सामाजिक भान जपत समाजसेवेत अग्रणी — ह.भ.प. बंड्या तात्या महाराज

भोसले दांपत्य सामाजिक भान जपत समाजसेवेत अग्रणी — ह.भ.प. बंड्या तात्या महाराज

फलटण (प्रतिनिधी)— दिलीपसिंह भोसले यांनी आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक भान ठेवले असून विविध सामाजिक कार्यात भोसले दांपत्य हिररीने भाग घेत असतात. असे प्रतिपादन व्यसनमुक्ती संघटनेचे प्रमुख ह भ प बंड्या तात्या महाराज कराडकर यांनी केले.

 श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या सदिच्छा भेटी प्रसंगी व्यसनमुक्ती संघटनेचे प्रमुख ह. भ. प. बंड्या तात्या महाराज बोलत होते. यावेळी सद्गुरु महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले,अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, स्वयं सिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले,महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले,वारकरी संघटनेचे ह.भ.प. केशवराव जाधव महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

 ह.भ. प.बंड्या तात्या महाराज म्हणाले, ज्या व्यक्तीच्या अंगी चांगले गुण असतात अशाच व्यक्तींना लोक मानतात दिलीप भैय्या आणि डॉ. जोशी हे आपला समाजाशी काही संबंध आहे हे न विसरता कार्य करत असतात व सर्वस्व झोकून देत असतात असे सांगून त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुकही केले.

कोपर्डे गावात दहा हजार झाडे लावून ज्ञानेश्वरी उपवन नावाचे उपवन उभारत असल्याचे सांगून या वनात नारळाची झाडे भेट म्हणून द्यावीत , कारण नारळ हे कल्पवृक्ष आहे आणि आपण दोघेही समाजाचे कल्पवृक्ष आहात म्हणून नारळाची रोपे भेट म्हणून या उपवनास द्यावीत अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी श्री. भोसले, डॉ. प्रसाद जोशी यांनी प्रत्येकी 101 चांगल्या प्रतीची नारळाची रोपे या ज्ञानेश्वरी उपवनास आपण भेट देऊ असल्याचे आपले मनोगतातून व्यक्त केले.

  ह. भ. प.केशवराव महाराज यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. कार्यक्रमास भजन स्पर्धेसाठी असणारे विविध वारकरी संप्रदायाचे लोक उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें