मांडवा शिवारात वाघाची दहशत शेतकरी भयभीत…
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , कोरपणा, संतोष मडावी /
कोरपणा तालुक्यातील मांडवा व जांभूळधारा शिवारात वाघाची दहशत पाहायला मिळत आहे.
सध्या शेतीच्या हंगाम सुरू असतानाच वाघाने दहशत माजवली आहे. परिसरामध्ये वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.अशातच आता शेतीचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांना ये-जा करत असताना वाट करू व गुरखे यांना गुरे चरण्यास भीती वाटत आहे. सध्या शेतीमध्ये डवरण फवारणी अशा प्रकारचे विविध कामे सुरू आहे. अशातच वाघाने दहशत या परिसरात माजवली या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना भीतीचे सावटात शेतीचे काम करावे लागत आहे. कालच वाघाने एका गाईवर हल्ला केल्याने बकऱ्या व गायचं चाराऊ यांच्यामध्ये भीती वाटत असतानाच असा प्रकार घडला. मांडवा येथील श्री नामदेव लसंते यांच्या गाई वर हल्ला झाला. अशातच वारंवार घटना होत असताना वन विभाग झोपा काढत आहे. जर एखादी शेतकऱ्यावर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांना येत आहे.मनून वन विभागाने त्या वाघाची तात्काळ बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे माजी उपतालुकाप्रमुख श्री नितेश महागोकार यांनी केले आहे.













