के. बी. एक्सपोर्टस् कंपनीकडून खंडणी वसूल करणारा गुंड सनी काकडे याच्यावर अखेर गुन्हा दाखल…

के. बी. एक्सपोर्टस् कंपनीकडून खंडणी वसूल करणारा गुंड सनी काकडे याच्यावर अखेर गुन्हा दाखल…

फलटण प्रतिनिधी : मागील चार दिवसापासून सोशल मीडियावर शेतकर्‍यांसाठी काम करणाऱ्या के. बी. एक्सपोर्टस् कंपनी आणि कंपनी संचालक सचिन यादव यांच्यावर खंडणीसाठी खोटे आरोप करणारा आरोपी सनी घनश्याम काकडे याच्यावर रात्री खंडणीचा गुन्हा दाखल झाला…

हा सराईत गुन्हेगार रोज कोणाला ना कोणाला तरी ब्लॅकमेलिंग करत असतो. पांढरपेशा माणूस इज्जतप्यारी म्हणुन म्हणुन शांत राहतो आणि हा गुंड खोटे आरोप करत राहतो आणि शेवटी खंडणी वसूल करून विषय संपतो. हे त्याचे सर्व कारनामे फलटणकराना माहीत आहेत. काल के. बी. एक्सपोर्टस् कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी ह्या गोष्टी सहन करणार नाही हे बोलून मुंबईला गेले आणि वरीष्ठ मंत्री व पोलिस अधिकारी यांना जाऊन भेटले. त्यांनंतर पोलिस डिपार्टमेंटने प्रकरणाची गांभीर्य पाहून व त्याचे मागचे गुन्हेगारी रेकॉर्ड पाहून त्याच्यावर खंडणी गुन्हा दाखल झाला. 

फलटणमध्ये एकही राजकिय व्यक्ति किवा त्यांचे कार्यकर्ते कंपनी चालवताना आजपर्यंत त्रास देत नाहीत, नेहमीच सहकार्य करतात पण काही समाज विघटक व गुंड फलटणला बदनाम करतात हे ही सचिन यादव यांनी वरिष्ठांशी बोलताना नमूद केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें