राज ठाकरेंनी घेतली कुसगाव लॉन्ग मार्चची दखल; आंदोलकांना भेटीचे निमंत्रण

राज ठाकरेंनी घेतली कुसगाव लॉन्ग मार्चची दखल; आंदोलकांना भेटीचे निमंत्रण

खोट्या बातम्यांविरुद्ध आंदोलकांचा रोष; दैनिकाची होळी करत शिवाजी महाराजांच्या फोटोचा सन्मान

कुसगाव येथून मंत्रालयाच्या दिशेने सुरू असलेल्या क्रशरविरोधी लॉन्ग मार्चच्या १९व्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी आंदोलक शिष्टमंडळाला भेटीला बोलावले. २५० किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती कार्यकर्त्यांमार्फत राज ठाकरे यांना मिळाली होती.

आधुनिक महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी पायी चालण्याची वेळ यावी, याबद्दल राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. आंदोलकांसाठी विशेष वेळ काढून त्यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित केला.

 

आंदोलक महिलांनी मागील १९ दिवसांपासून जिल्हा प्रशासन वा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याचा टाहो फोडला. यावर राज ठाकरे यांनी आंदोलकांना आंदोलन सुरू ठेवण्यास प्रोत्साहन देत स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, आवश्यकता भासल्यास या प्रकरणी मोठे आंदोलन उभारण्याच्या सूचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे बेकायदेशीर दगडखाणींचे प्रकरण लवकरच मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल आणि यामागील खरे चेहरे समोर येतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

चौकट: खोट्या बातम्यांविरुद्ध आंदोलकांचा संताप

दोन दिवसांपूर्वी वाई तालुक्यातील एका वृत्तपत्रात आंदोलक आणि आंदोलनाबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचा आंदोलकांनी तीव्र निषेध केला. संबंधित वृत्त पत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सन्मानपूर्वक काढून उर्वरित वृत्तपत्राची होळी करण्यात आली आणि त्याला तुडवण्यात आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें