फलटण तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील ०३ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार 

फलटण तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील ०३ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार 

फलटण प्रतिनिधी:

सातारा जिल्हयामधील लोणंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) विकी ऊर्फ बाळु बापुराव खताळ, वय २३ वर्षे, रा कापडगांव ता फलटण जि सातारा २) शुभम ऊर्फ सोनु आप्पासो घुले, वय २३ वर्षे, रा कापडगांव ता फलटण जि सातारा ३) सुयोग हिंदुराव खताळ, वय २७ वर्षे, रा कापडगांव ता फलटण जि सातारा यांचे टोळीवर दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे, चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशील भोसले यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा तसेच पुणे, सोलापुर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुन ही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे लोणंद तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

ऊर्फ मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख १) विकी बाळु बापुराव खताळ, वय २३ वर्षे, रा कापडगांव ता फलटण जि सातारा २) शुभम ऊर्फ सोनु आप्पासो घुले, वय २३ वर्षे, रा कापडगांव ता फलटण जि सातारा ३) सुयोग हिंदुराव खताळ, वय २७ वर्षे, रा कापडगांव ता फलटण जि सातारा यांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा तसेच पुणे, सोलापुर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३८ उपद्रवी टोळयांमधील १३१ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे ३८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १७३ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस, लोणंद पोलीस ठाणेचे पो.हवा नितीन भोसले, पोकॉ अमोल जाधव, मपोकॉ स्नेहल कापसे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal