महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेची बैठक संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारणी विस्तारासबंधी बैठक शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे काल 14 रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ सल्लागार नारायण जेठवानी हे होते. बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश मोरे यांच्या हस्ते नूतन कार्यकारणीला नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नाशिक येथील सर्वश्री सोमनाथ पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून हितेंद्र निकम, महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी प्रतीक जाधव, जळगाव जिल्हा सचिव पदी दीपकसिंग मोरकर, जळगाव जिल्हा संघटकपदी श्रीकांत भामरे तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी सुनिता महाडिक, अकोला जिल्हाध्यक्ष पदी सचिन देशपांडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रतीक जाधव यांनी संघटनेची ध्येयधोरणे तसेच संघटना आगामी काळात परिसंवाद तसेच पत्रकारांसाठी कार्यशाळा घेणार असून यासाठी सर्व कार्यकारिणीने पुढाकार घेऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय सपकाळे तसेच संघटनेचे किशोर जाधव, जळगाव जिल्हा संघटक योगेश्वर राठोड, जाकीर मिर्झा, कैलास सूर्यवंशी, विनोद झाल्टे, पराग सोनार, रणधीर जाधव, सत्यजित पाटील, निळकंठ साबणे, सुभाष जाधव, आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.












