उष्णतेच्या लाटेच्या प्रतिसादासाठी मार्गदर्शक सूचनांची कोटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

उष्णतेच्या लाटेच्या प्रतिसादासाठी मार्गदर्शक सूचनांची कोटेकोर अंमलबजावणी करा– जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि.24:राज्यातील विविध जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो. उष्णतेच्या लाटामुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता, जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग, नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाय योजना व मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. या सूचनांची विविध विभागांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. 

यामध्ये नगरपालिकेने करावयाची कार्यवाही : बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टँड, टॅक्सी स्टॅड, रिक्षा स्टँड इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी तसेच सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी (पंखा/कुलर इ. नादुरुस्त असल्यास दुरुस्त करावे) सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी संबंधित घ्यावयाची काळजी, संदर्भात पोस्टर्स/बॅनर्स लावावेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात आणि त्याच्या वापराबाबत आवश्यक सूचना लिहाव्यात. टॅक्सी स्टँड, बस स्टँड (सरकारी/खाजगी), बाजार क्षेत्र आणि सरकारी कार्यालये या सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शॉपिंग मॉल्स मध्ये ग्राहकांसाठी आणि बाहेरील लोकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी. तसेच बाहेरील लोकांना पाण्याच्या उपलब्धतेबद्दल माहिती देण्यासाठी मार्गदर्शक फलक ठेवावे. उपलब्ध असल्यास रस्त्यावर पाणी शिंपडावे. सर्व उद्याने दुपारी १२ ते दुपारी ४ वेळेत खुली ठेवावीत. 

आरोग्य विभागाने करावयाची कार्यवाही : उष्णतेच्या लाटेशी संबंधित आजार निरीक्षण आणि अहवाल तयार करणेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करावे. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्या संबंधित माहिती फलक लावावेत. उष्माघाताच्या रुग्णासाठी आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र वैद्यकीय वॉर्डाची व्यवस्था करावी. उष्माघाताच्या रूग्णांच्या उपचारासाठी जलद प्रतिसाद टीम तयार करावी. बहुउद्देशीय कामगार, आशा वर्कर्स यांना उष्माघाताच्या रुग्णाचे उपचार आणि तपशील गोळा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. उपलब्ध माहिती तालुका आरोग्य आधिकारी याच्याकडे पाठवावी. रुग्णवाहिका सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः दुपारी तत्पर ठेवावी. प्राथमिक आरोग्य केंद्र (PHCs) आणि इतर स्थानिक रुग्णालयांमध्ये ORS पावडरसह आवश्यक वैद्यकीय सुविधा यांचा साठा पुरेसा ठेवावा. लहान मुले, अपंग व्यक्ती, स्त्रिया, वृद्ध लोक आणि मजूर यांसारख्या गटांसाठी विशेष काळजी घेण्याची व्यवस्था करावी.

पंचायत विभाग : पंचायत स्तरावर जागरूकता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्याच्या उपायांचा प्रसार करावा.मनरेगा कामगारांच्या कामाचे तासांचे नियोजन करा आणि कामाच्या ठिकाणी सावली आणि थंड पाणी द्यावे. उष्णतेच्या सतर्कतेच्या वेळी निवाऱ्याची सोय करावी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवावी. उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृतीसाठी ग्रामसभेचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करण्यात यावा.

 शिक्षण विभाग (प्राथमिक आणि माध्यमिक): हवामान खात्याकडून आलेल्या चेतावणींनुसार शाळा/महाविद्यालयांचा वेळा नियोजन करा आणि थंड वर्गखोल्या, प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी. शाळेच्या वेळांमध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार सुट्टी देण्यात याव्या. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत. दुपारच्या सत्रात मैदानावरील खेळांचे नियोजन करू नका. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करा आणि आपत्कालीन सेवांचा संपर्क द्या. परीक्षा सकाळच्या सत्रातच घेतल्या जाव्यात. पंखे सुस्थितीत राहतील याची खात्री करावी. माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना सरबत, ताक आणि ORS पॅकेट द्यावे.

कामगार विभाग : कामगारांवर उष्णतेच्या लहरींचा प्रभाव कमी करण्यासाठी वेळोवेळी सूचना द्या आणि आवश्यक सुविधा द्याव्या. कामगारांचे कामाच्या तासांचे नियोजन करा आणि कामाच्या ठिकाणी सावली आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावा. कामगारांना उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण द्यावे.

परिवहन विभाग : कमाल उष्णतेच्या लाटे दरम्यान सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुरळीत राहील आणि प्रतीक्षा क्षेत्रावर सावली, पाणी आणि पंखे याची सोय करावी. प्रवाशांना माहितीपत्रक वितरित करावे. दुरचित्रफीत, IEC प्रसारित करण्यासाठी बसस्थानके इत्यादीचा सार्वजनिक संबोधन प्रणालीचा वापर करावा. उन्हाळ्यात सर्व बसेसमध्ये प्रथमोपचार किट (ORS च्या मुबलक साठयासह) असल्याची खात्री करावी. बस स्थानकावर पाण्याची सोय, पंखे सुस्थितीत असावे.

वन विभाग : वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी पुरेसे वृक्षारोपण आणि पाण्याचा पुरवठा असावा. आग रोखण्यासाठी वनक्षेत्रांचे निरीक्षण करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करावे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी आणि कुपनलिका आणि तलावांची तातडीने दुरुस्ती करावी. उन्हाळी हंगामापूर्वी सर्व प्रकारच्या जलस्रोतांची तपासणी आणि देखभाल करावी. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी पुरवठ्याच्या वेळेचे नियोजन करावे. या सूचना विशेषतः सार्वजनिक पाण्याच्या वापरा संदर्भात ग्राम पंचायत स्तरावर देण्यात याव्यात.

सार्वजनिक बांधकाम विभाग : सरकारी इमारती आणि संस्थांमध्ये कूल रूफ पेंटच्या वापराबद्दल प्रचार करावा. बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी निवारा आणि प्रथमोपचार किट उपलब्ध करावे.

ऊर्जा विभाग : उष्णतेच्या लाटांमध्ये वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी सर्व उपाय योजना करण्यात याव्या. वीज बिलांवर उष्णता लहरीशी संबंधित IEC सामग्री प्रसारित करावी किंवा वीज बिलांसह IEC-संबंधित माहितीपत्रक वितरित करावे.

कृषी विभाग : उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती प्रसारित करण्यासाठी “शेतकरी मित्र” यांचा वापर करावा. शेत तलावांच्या देखभालीसाठी किंवा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. शेतीवर आधारित उपजीविकेसाठी पाण्याची उपलब्धते संदर्भात नियोजन करावे.

पोलीस विभाग : पोलिसांसाठी सिग्नलवर निवारा किंवा बूथ उभारणी करावी. पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक बूथवर प्रथमोपचार किट उपलब्ध करावे. प्रत्येक पोलिस स्टेशनवर एका पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण आयोजित करावे. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मुबलक पाण्याची व्यवस्था तसेच जागेच्या उपलब्धते प्रमाणे कार्यक्रमांना परवानगी द्यावी.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक सर्वसमावेशक “उष्णतेची लाट कृती आराखडा”, व मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि घटना प्रतिसाद प्रणाली (IRS) विकसित करावी. ज्यामध्ये लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध जिल्हा भागधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्णतेच्या लाटेच्या संदर्भात जिल्हा स्तरावर उष्मालाट नोडल अधिकारी नियुक्त करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

उष्णतेच्या लाटेच्या बचावासाठी अशी घ्या काळजी

जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही. तहान हे निर्जलीकरणाचे चांगले सूचक नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल डीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक/लस्सी आणि फळांचे रस यासारखी घरगुती पेये प्यावीत. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्या.

पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. डोके झाकून ठेवा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात. हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखा. दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे, विशेष घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला. थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात. जर घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी. शासनाने दिलेल्या या मार्गर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करुन उष्णतेच्या लाटेपासून बचाव करावा.         

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal