नीरा उजव्या कालव्यात मृत कोंबड्या ? ; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे WhatsApp स्टेटस च्या माध्यमातून केली नाराजी व्यक्त

नीरा उजव्या कालव्यात मृत कोंबड्या ? ; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे WhatsApp स्टेटस च्या माध्यमातून केली नाराजी व्यक्त, 

फलटण प्रतिनिधी : फलटणसह माळशिरस तालुक्यातून जात असलेल्या निरा उजवा कालव्यामध्ये दोन ते तीन हजार मृत कोंबड्या टाकल्या असल्याचा प्रकार समोर आला असून विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे व्हिडिओ व्हायरल करत संताप व्यक्त केला आहे. “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या प्रार्थनेवरती सदर व्हिडिओ

स्टेटसला टाकला आहे.

श्रीमंत रामराजे यांनी ठेवलेल्या स्टेटस मध्ये लिहिले आहे की किती स्वार्थी कृती आहे ही, या कालव्या वरती कितीतरी माणसे जनावरे पाणी पितात. आणि याच पाण्यात मृत कोंबड्या टाकून कितीतरी लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न कोणीतरी महात्म्याने केला आहे. त्याला थोडीशीही जाणीव नाही की तो हे कृत्य करून कितीतरी जणांच्या जीवांचे नुकसान करतोय.असं कृत्य करणे म्हणजे माणुसकीला काळीमा फासण्यासारखे आहे. केलेले कृत्य चुकीचे असून असं कृत्य यापुढे कोणी करू नये आणि

प्रशासनाने याची नोंद घेऊन संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणीच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें