सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी नाशिकमध्ये हाय अलर्ट! ड्रोन उडवण्यावर निर्बंध!

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी नाशिकमध्ये हाय अलर्ट! ड्रोन उडवण्यावर निर्बंध!

नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी!

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

रामकुंड आणि गोदाघाट परिसरात होणाऱ्या या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती अपेक्षित असल्याने सुरक्षेची तयारी वाढवण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २९ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजून १ मिनिटापासून ते ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत ड्रोन उडवण्यास आणि ड्रोनद्वारे छायाचित्रण व चित्रीकरण करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नाशिक ग्रामीण क्षेत्रातही ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी ड्रोन व पॅराग्लायडिंगवर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

त्यामुळे नागरिक आणि छायाचित्रकारांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे आणि आवश्यक परवानगीशिवाय ड्रोनचा वापर करू नये.

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत राहा…

AVB MAZA NEWS — नाशिक प्रतिनिधी, सचिन देवरे!

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें