निरगुडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नवा आदर्श; भारतीय संविधान उद्देशिका १३५ प्रती व १३५ वृक्ष आणि रक्तदानाचा उपक्रम

निरगुडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नवा आदर्श; भारतीय संविधान उद्देशिका १३५ प्रती व १३५ वृक्ष आणि रक्तदानाचा उपक्रम

 

फलटण | प्रतिनिधी :दि. २७ रोजी विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त निरगुडी येथे सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. रक्तदान, संविधान जागर आणि वृक्षसंवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रमाला नागरिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या भव्य रक्तदान शिबिरास लोकध्यास वृत्तपत्राचे संपादक राजकुमार काकडे, महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अप्पा गायकवाड, बहुजन समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रेम मोरे, सचिन माने, आशिष काटे तसेच ॲड. ऋषिकेश बिचुकले, मा. सरपंच जालिंदर सस्ते, महेंद्र गोरे, धनंजय लकडे, हणमंत गायकवाड, महादेव गोरे, संदीप खवळे आणि पै. पवन लकडे यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या १३५ प्रतींचे वितरण आणि १३५ वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संवर्धन व संविधान मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. सिद्धार्थ तरुण मंडळ, निरगुडी, एस.टी.एम बॉयज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती, निरगुडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रक्तदात्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर