तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पुनवडी शाळेचे दैदीप्यमान यश

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पुनवडी शाळेचे दैदीप्यमान यश
खंडाळा प्रतिनिधी 
गणेश गुरव
जावली तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धेत अवघ्या 13 पटाच्या पुनवडी शाळेतील विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश मिळवले.600 मीटर धावणे स्वरा पार्टे तृतीय क्रमांक, मुलींच्या रिले संघाने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला या संघामध्ये प्रणिता उंबरकर, स्वरा पार्टे,ईश्वरी पार्टे,समिक्षा कदम,वेदिका ओंबळे यांनी सहभाग घेतला.पियुष पार्टे याचा सहभाग असलेल्या रस्सीखेच संघाने प्रथम क्रमांक तर कुस्ती स्पर्धेत प्रथम पार्टे याने 22 किलो वजनी गटात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला.अंश पार्टे याने कुस्तीमध्ये उत्तम कौशल्य दाखवून सर्वांची वाहवा मिळवली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ साहेब,विस्तार अधिकारी अरविंद दळवी साहेब,केडंबे केंद्राचे केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप,पुनवडी गावचे सरपंच सुरेश पार्टे आदिंनी अभिनंदन केले.यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक विशाल दळवी व भोसले मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें